सांगली जिल्हा बँकेसमोर शिवसेनेचं ढोलनाद आंदोलन0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

सांगली : संपूर्ण कर्जमाफी व अन्य मागण्यांसाठी सांगली जिल्हा बँकेसमोर शिवसेनेच्यावतीने ढोल नाद आंदोलन करण्यात आले.

यावेळी बँक प्रशासनास महाराष्ट्र शासनाच्या छ. शिवाजी महाराजांच्या नावाने जी कर्ज माफी कृषि सन्मान योजना जाहीर झाली आहे, त्याच्या निकषानुसार जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत, याची यादी आपल्या प्रधान कार्यालयासमोर डिजीटल फलक लावून जनतेसमोर जाहीर करावी, या मागणीचे निवेदन दिले.

जिल्हाप्रमुख आनंदराव पवार (बापू), जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.

जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, शिवसैनिक व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती शिवसेना नेते प्रशांत लेंगरे यांनी दिली.जाहिरात


सांगली जिल्हा बँकेसमोर शिवसेनेचं ढोलनाद आंदोलन

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
ये रे ये रे पावसा ! कोयना धरणाची आर्त हाक !

कोयनानगर (विजय लाड) :  ५ जुलैपासून मुसळधार पावसासाठी प्रतीचेरापूंजी अशी ओळख असलेल्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस गायब झाला आहे.

Close