कडेगाव विरोधीपक्ष नेत्यांच्या तक्रारीबाबतच्या निर्णयाचा चेंडू आता जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (टिम केपी लाइव न्यूज) : कडेगाव नगरपंचायतीच्या ३० जून रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेची नोटीस न मिळाल्याची तक्रार विरोधी पक्षनेते उदयकुमार देशमुख यांनी जिल्हाधिकारी, सांगली यांना दिली होती. या संदर्भात, जिल्हाधिकारी यांनी मुख्याधिकारी कडेगाव नगरपंचायत यांना चौकशीचे आदेश दिले होते. यासंदर्भात चौकशी अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी चरण कोल्हे यांनी ‘कडेगाव-पलूस लाइव न्यूज’ला दिली. यासंदर्भात जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील काय निर्णय देतात, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

विरोधी पक्षनेते उदयकुमार देशमुख यांनी सत्ताधारी पक्षावर गंभीर आरोप करीत मनमानी कारभार सुरु असल्याची आणि भ्रष्टाचार लपविण्यासाठी सर्वसाधारण सभेची नोटीस देणे टाळले असल्याचे तक्रारीमध्ये नमूद केले होते. यासंदर्भात, सत्ताधारी पक्षाकडून अजूनही काहीच स्पष्टीकरण करण्यात आले नाही.
जाहिरात 

कडेगाव विरोधीपक्ष नेत्यांच्या तक्रारीबाबतच्या निर्णयाचा चेंडू आता जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल विभूते यांचा सत्कार

पलूस: श्री. ​संजय बापु विभुते यांची शिवसेना जिल्हाप्रमुख निवड झाली आहे. याबद्दल सेनानेते प्रशांत लेंगरे यांनी त्यांच्या सत्काराचे आयोजन केले

Close