सात दिवसाच्या विश्रांतीनंतर कोयनेत पावसाचे आगमन0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कोयनानगर (विजय लाड) : गत सप्ताहापासून गायब झालेल्या पावसाने कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पुनरागमन केले आहे. पाणलोट क्षेत्रात हलक्या स्वरूपात पाऊस चालू झाला आहे. यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक 4,738 क्यूसेक्स असून धरणात सध्या 39 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

गेल्या सात दिवसापासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे वाढत जाणाऱ्या धरणाच्या पाणी साठ्याच्या वाढीस ब्रेक लागला आहे. सात दिवसाच्या विश्रांतीनंतर धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने पुन्हा आगमन केले आहे. गत चोवीस तासात कोयनानगर येथे 43 मिमी, नवजा येथे 35 मिमी महाबळेश्वर येथे 52 नोंद झाली होती. पाणलोट क्षेत्रात हलक्या सरी कोसळत असल्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मंदावल्यामुळे पाणीसाठ्यात होणारी वाढ थांबली आहे.

आज दिवसभर पाणलोट क्षेत्रात पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. कोयनानगर येथे 25/1532 मिमी नवजा येथे 52/1762 मिमी महाबळेश्वर येथे 25/1544 मिमी पाऊसाची नोंद झाली आहे. धरणाची जलपातळी 2093.00 फूट झाली असून धरणात 39.40 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
जाहिरात 

सात दिवसाच्या विश्रांतीनंतर कोयनेत पावसाचे आगमन

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कडेगाव विरोधीपक्ष नेत्यांच्या तक्रारीबाबतच्या निर्णयाचा चेंडू आता जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात

कडेगाव (टिम केपी लाइव न्यूज) : कडेगाव नगरपंचायतीच्या ३० जून रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेची नोटीस न मिळाल्याची तक्रार विरोधी पक्षनेते

Close