मद्यपींची महिलांना धक्के मारण्यापर्यंत मजल ; तहसीलदार कार्यालय परिसरातील वाईनशॉप बंद करण्याची मागणी0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव : कडेगावमध्ये दारुबंदीचे वारे जोरदार वाहत असतानाच तहसीलदार कार्यालय परिसरात नव्याने सुरू झालेल्या वाईन शॉप विरोधातही महिला एकवटल्या आहेत.

आज या वाईन शॉपवर महिलांनी मोर्चा नेला. त्यानंतर महिलांनी थेट तहसीलदार कार्यालय गाठले. तिथे तहसीलदार अर्चना शेटे यांच्याशी महिला आणि नागरीकांनी चर्चा केली. आपल्या व्यथा मांडल्या. या वाईन शॉपजवळ नागरी वस्ती आहे. इथल्या महिला, लहान मुलांना तसेच विद्यार्थ्यांना या मद्यपींचा त्रास होतो. काही मद्यपींची महिलांना धक्के मारण्यापर्यंत मजल जाते, असेही महिलांनी सांगितले.

यावर तहसीलदार शेटे यांनी तक्रारीची दखल घेत कायदेशीर बाबी तपासून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. महिलांना त्रास होणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाईल, अशीही ग्वाही त्यांनी दिली. याबाबत कार्यवाही न झाल्यास हे वाईन शॉप फोडण्याचा इशाराही महिलांनी दिला. प्रभाग क्रमांक १५ मधील नागरिकांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.जाहिरात 

मद्यपींची महिलांना धक्के मारण्यापर्यंत मजल ; तहसीलदार कार्यालय परिसरातील वाईनशॉप बंद करण्याची मागणी

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
सात दिवसाच्या विश्रांतीनंतर कोयनेत पावसाचे आगमन

कोयनानगर (विजय लाड) : गत सप्ताहापासून गायब झालेल्या पावसाने कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पुनरागमन केले आहे. पाणलोट क्षेत्रात हलक्या स्वरूपात

Close