संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांचा कडेगावात रास्ता रोको0 मिनिटे

Print Friendly

कडेगाव : भाजपा कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे जेष्ठ नेते आमदार मोहनराव कदम यांच्या पुतळा दहन केल्याप्रकरणी काँग्रेस कार्यकर्ते आज आक्रमक झाले. भाजप कार्यकर्त्यांनी दुपारी पुतळा दहन केल्यानंतर काही वेळातच काँग्रेस कमिटी कार्यालयाजवळ तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते गोळा होऊ लागले होते. युवानेते डॉ. जितेश भैय्या कदम यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्त्यांतर्फे एक निवेदन बनवण्यात आले व ते कडेगाव पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना देण्यात आले. यामध्ये पुतळा दहन करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना त्वरीत अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.

पोलिसांना निवेदन दिल्यानंतर एका तासात कारवाईचे आश्वासन देण्यात आले होते पण एका तासानंतरही पोलिसांची कार्यवाही सुरूच असल्याने संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन केले. अटक झाल्याशिवाय माघार न घेण्याचा युवा नेते डॉ. जितेश (भैय्या) कदम यांनी निर्धार दर्शविल्याने बराच काळ वाहतूक ठप्प होती. ‘जितेशभैय्या आगे बढो…’ च्या घोषणा कडेगाव बसस्थानक परीसरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या.

अखेर घटनास्थळी कडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पुजारी आले व त्यांनी डॉ. जितेश कदम आणि आंदोलकांशी तब्बल तासभर चर्चा केली. दरम्यान, काही आंदोलकांनी रस्त्यावर टायर पेटवल्याने परीस्थिती गंभीर झाली होती व सुमारे दिड तास वाहतूक ठप्प झाली होती. शेवटी तहसीलदार अर्चना शेटेही घटनास्थळी दाखल झाल्या आणि एकत्रित चर्चेमधून चोवीस तासात अटक करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले.

सुमारे अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली व जळणारे टायर बाजूला काढले. पो. नि. पुजारी व तहसीलदार अर्चना शेटे यांनी अत्यंत जबाबदारपणे रस्त्यावर स्वतः उभे राहून परिस्थिती सामान्य बनवली. दिवसभरातील घडामोडींमुळे कडेगाव शहर व तालुक्यात तणावाची स्थिती  राहिली.जाहिरात


 

Comments

comments

संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांचा कडेगावात रास्ता रोको

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
भाजपच्यावतीनं आ. मोहनराव कदम यांच्या पुतळ्याचे कडेगावमध्ये दहन

कडेगाव : सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, युवा नेते संग्रामसिंह देशमुख, जिल्हा बँक अध्यक्ष दिलीपराव पाटील (तात्या) यांच्याबाबत अपशब्द वापरल्याप्रकरणी कॉंग्रेसचे

Close