भाजपच्यावतीनं आ. मोहनराव कदम यांच्या पुतळ्याचे कडेगावमध्ये दहन0 मिनिटे

Print Friendly
कडेगाव : सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, युवा नेते संग्रामसिंह देशमुख, जिल्हा बँक अध्यक्ष दिलीपराव पाटील (तात्या) यांच्याबाबत अपशब्द वापरल्याप्रकरणी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार मोहनराव कदम यांच्या पुतळयाचं भाजपच्यावतीनं कडेगाव इथं दहन करण्यात आलं. भाजपचे युवा नेते धनंजय देशमुख, कडेगाव पंचायत समितीच्या सभापती मंदाताई करांडे, कडेगाव नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते उदय देशमुख, अनुसूचित जाती जमाती सेलचे तालुकाध्यक्ष विठ्ठल खाडे, सामाजिक कार्यकर्ते मोकळे सर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
 
सांगली इथं झालेल्या जिल्हा बँकेच्या बैठकीत या नेत्यांमध्ये वाद झाला. जिल्हा बँकेच्या वांगी इथल्या शाखेच्या स्थलांतराचा विषय होता. या बैठकीत पत्रकाराना प्रवेश नसल्यामुळे अधिक तपशील उपलब्ध नाही, मात्र बैठकीनंतर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार मोहनराव कदम यांच्या निषेधाचे मेसेज सोशल मिडीयावर येवू लागले.
 
शनिवारी दुपारी भाजपच्या वतीने आमदार मोहनराव कदम यांच्या पुतळ्याचे दहन करण्याचे आंदोलन घेण्यात आले. बसस्थानकासमोर हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर सहभागी नेत्यांनी कडेगाव पलूस लाईव न्यूजशी संवाद साधला आणि आमदार मोहनराव कदम यांचा निषेध केला.    


जाहिरात


Comments

comments

भाजपच्यावतीनं आ. मोहनराव कदम यांच्या पुतळ्याचे कडेगावमध्ये दहन

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0