कडेगावात काँग्रेसचा भव्य निषेध मोर्चा0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार मोहनराव कदम यांचा पुतळा दहन केल्याप्रकरणी अजूनही संबंधित भाजप कार्यकर्त्यांना अटक न झाल्याच्या निषेधार्थ आज काँग्रेसतर्फे कडेगाव येथे मोर्चा काढण्यात आला. मोर्च्याचे नेतृत्व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम व युवा नेते डॉ. जितेश कदम यांनी केले.

यावेळी डॉ. विश्वजीत कदम यांनी भाजपवर घणाघाती टिका केली. ज्या लोकांची पात्रता नाही असे लोक मोहनदादांसारख्या ज्येष्ठ आणि आदर्श नेत्यांवर टिका करत आहेत. भ्रष्ट्राचारी प्रतिमा असणाऱ्या स्वार्थी राजकारण्यांनी काँग्रेस पक्षाच्या सुसंस्कृत राजकारणावर टीका करू नये, असे त्यांनी ठणकावले. सत्ता कुठल्याही पक्षाची असली तरी कदम घराणे कडेगाव-पलूस भागात आपल्या सुसंस्कृत राजकारणाच्या माध्यमातून काम करत राहणार अशी त्यांनी ग्वाही दिली. पुतळा दहन करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना अटक करण्यास पोलिसांनी का दिरंगाई केली आहे, असा सवाल त्यांनी विचारला. मोहनदादांवर टिका करणारे काँग्रेसचे विरोधक नेते नुकतेच राजकारणात आले आहेत, त्यामुळे, त्यांनी शिकण्यावर भर द्यावा व ज्येष्ठ राजकारणी मंडळींवर टिका करणे टाळावे, असेही त्यांनी सांगितले.

युवानेते डॉ. जितेश (भैय्या) कदम यांनी आपल्या आक्रमक शैलीत पुतळा दहन प्रकरण आणि ते करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांचा समाचार घेतला. पुतळा दहन प्रकरणात कारवा

अटक का केली गेली नाही, या संदर्भात पूर्ण चौकशी करण्यात येईल व या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करून छडा लावण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. येणाऱ्या ग्रामपंचायत आणि विधानसभा निवडणुकीत कडेगाव-पलूस भागातील जनता भ्रष्टाचारी राजकारण्यांना त्यांची योग्य जागा दाखवून देईल, असेही त्यांनी सांगतले.

दोन दिवसापूर्वी आमदार मोहनराव कदम आणि जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कडेगाव व वांगी शाखेच्या जागा स्थलांतरावरून खडाजंगी झाली होती. त्यानंतर कडेगाव येथे भाजप कार्यकर्त्यांनी मोहनराव कदम यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर लगेचच काँग्रेसचे युवानेते डॉ. जितेश (भैय्या) कदम यांच्या नेतृत्वाखाली कडेगाव पोलीस स्टेशनमध्ये मोहनराव कदम यांचा अवमान केलेल्या भाजप कार्यकर्त्यांना अटक करण्यात यावी, असे निवेदन देण्यात आले होते. पोलिस कारवाईस विलंब झाल्याने तब्बल दोन तास कडेगाव बस्थानकानजीक रास्ता रोको करण्यात आले होते. दिड तासाच्या दीर्घ चर्चेनंतर २४ तासात अटक करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, अटक न झाल्याने अखेर आज काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले व भव्य मोर्च्याच्या माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला.

अजूनही अटकेची कारवाई न झाल्यास आणखी मोर्चे निघतील व अवमानना प्रकरण तडीस नेल्याशिवाय शांत बसणार नाही, असे मा. डॉ. विश्वजित कदम व डॉ. जितेश (भैय्या) कदम यांनी ‘कडेगाव-पलूस लाइव न्यूज’ शी बोलताना सांगितले.

कडेगावमधील काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी अत्यंत शिस्तबद्ध नियोजन करत मोर्चा यशस्वी केला.जाहिरात


 

कडेगावात काँग्रेसचा भव्य निषेध मोर्चा

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांचा कडेगावात रास्ता रोको

कडेगाव : भाजपा कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे जेष्ठ नेते आमदार मोहनराव कदम यांच्या पुतळा दहन केल्याप्रकरणी काँग्रेस कार्यकर्ते आज आक्रमक झाले. भाजप

Close