मोजमापामध्ये घोळ करणाऱ्या पेट्रोल पंपांवर कारवाईची युवासेनेची पलूसमध्ये मागणी0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

पलूस: पेट्रोल पंपांवर मोजमाप करताना घोळ होत असल्याच्या कारणावरून शासनाने सुरु केलेल्या धाडसत्रामध्ये पलूस येथील पेट्रोल पंपांचीही तपासणी व्हावी व दोषी पंपांवर कारवाई करण्यात यावी, अश्या आशयाचे निवेदन आज पलूस युवासेने तर्फे पलूस तहसीलदार यांना देण्यात आले.

अलीकडे पेट्रोल व डीझेल देताना मोजमाप ‘अचूक’ होत नसल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. सामन्यांना यामुळे मानसिक तसेच आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. याप्रकरणी, प्रशासनाने त्वरीत पाऊले उचलावीत आणि गरीबांची लुट करणारे पेट्रोल पंप बंद करण्यात यावेत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

याप्रसंगी प्रशांत लेंगरे, विजय आरबुने, महेश शिंदे, अक्षय होनकळसे, गिरीश पोवार, विशाल शिंदे, जगदीश पवार, आणि मोठ्या संख्येने  शिवसैनिक उपस्थित होते.जाहिरात


 

 

8 thoughts on “मोजमापामध्ये घोळ करणाऱ्या पेट्रोल पंपांवर कारवाईची युवासेनेची पलूसमध्ये मागणी

Comments are closed.

मोजमापामध्ये घोळ करणाऱ्या पेट्रोल पंपांवर कारवाईची युवासेनेची पलूसमध्ये मागणी

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
8
Read previous post:
कडेगावात काँग्रेसचा भव्य निषेध मोर्चा

कडेगाव : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार मोहनराव कदम यांचा पुतळा दहन केल्याप्रकरणी अजूनही संबंधित भाजप कार्यकर्त्यांना अटक न झाल्याच्या निषेधार्थ

Close