कोयनेत ‘सैराट’ पाऊस0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कोयनानगर (विजय लाड) : मुसळधार पर्जन्यमानासाठी अनुकूल पुष्य नक्षत्राच्या आगमनामुळे गत सात दिवसापासून मुसळधार पाऊस कोयना पाणलोट क्षेत्रात” सैराट “झाला आहे. पाणलोट क्षेत्रात सैराट झालेल्या पावसाच्या सरीवर सरी कोसळत असून यामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात चोवीस तासात पुन्हा एकदा पाच टीएमसीने वाढ झाली आहे.

धरणात 57.49 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणातील पाणीसाठा यामुळे  55 टक्के झाला आहे. गत चोवीस तासात कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे 188 मिमी नवजा येथे 213 मिमी महाबळेश्वर येथे 152 मिमी पावसाची नोंद झाली होती. कोयनानगर येथे 125/2274 मिमी, नवजा येथे 175/2648 मिमी तर महाबळेश्वर येथे 70/2190 मिमी पावसाची नोंद झाली. पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक 54,075 क्यूसेक्स झाल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात चोवीस तासात पुन्हा एकदा 5 टीएमसीने वाढ झाली आहे. धरणाची जलपातळी 2115.07 फूट झाली असून धरणात 57.49 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.जाहिरात


 

कोयनेत ‘सैराट’ पाऊस

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
चेतनची स्पर्धा परीक्षा लायब्ररी ठरत आहे ग्रामीण युवा विकासाचे मॉडेल

नेर्ली (सागर वायदंडे): वाचन चळवळ हल्ली लोप पावत चालली आहे अशी सगळीकडे ओरड केली जाते परंतु, नेर्ली गावातील चेतन सावंत

Close