हर्षल वाघिरे यांच्या ‘शिवकृष्णाई’ संस्थेच्या कार्यालयाचे उदघाटन संपन्न0 मिनिटे
कडेगाव : तरुण समाजसेवक व धडाडीचे कार्यकर्ते हर्षल वाघिरे यांच्या ‘शिवकृष्णाई बहुदेशीय सेवाभावी संस्थे’च्या कार्यालयाचे औपचारिक उदघाटन आज कडेगाव येथील प्रतिष्ठित नागरीक व सामाजिक कार्यकर्त्या सौ. वडगावी यांचे हस्ते झाले.
कार्यक्रमास कडेगाव परीसरातील नागरीक उपस्थित होते.
काही महिन्यापूर्वी हर्षल वाघिरे यांनी कडेगाव ते अक्कलकोट अशी सायकल वारी करून वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांवर तसेच लिंगायत धर्माविषयी जनजागृती विषयक माहिती प्रसार केला होता.
शिवकृष्णाई संस्था कडेगाव परीसरातील पर्यावरणाचे प्रश्न तसेच इतर सेवाभावी कामे यासाठी सजग राहील व विकासामध्ये पूर्ण योगदान देईल, अशी ग्वाही हर्षल वाघिरे यांनी दिली. मोठ्या संख्येने युवा कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
जाहिरात