​कोयना धरणात 78 टीएमसी पाणीसाठा0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कोयनानगर  (विजय लाड) : गत सात दिवसापासून मुसळधार पावसाचा जोर कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मंदावला आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली आहे. यामुळे गत चोवीस तासात कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात केवळ 1 टीएमसीने वाढ झाली आहे.

धरणात 78 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गत चोवीस तासात पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे 66 मिमी, नवजा येथे 46 मिमी तर महाबळेश्वर येथे 89 मिमी पावसाची नोंद झाली आहे. आज दिवसभर पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. कोयनानगर येथे 30/3,008 मिमी, नवजा येथे 20/3,307 मिमी तर महाबळेश्वर येथे 25/2,847 मिमी पाऊस झाला आहे.

धरणात यामुळे येणाऱ्या पाण्याची आवक 20,120 क्यूसेक्स झाली आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मंदावल्यामुळे चोवीस तासात धरणाच्या पाणी साठ्यात 1 टीएमसीने वाढ झाली आहे. धरणाची जलपातळी 2149.5 फूट झाली असून धरणात 78.44 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.जाहिरात

​कोयना धरणात 78 टीएमसी पाणीसाठा

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
​बोलतानाची भीती नक्की येते कुठून?

निमंत्रित लेख (सेल्फहूड या सर्वांगीण विकास प्रशिक्षण देणाऱ्या खाजगी संस्थेतर्फे येत्या ३० जुलैला कडेगाव येथे  'वक्तृत्व प्रशिक्षण कार्यशाळे'चे आयोजन करण्यात

Close