कडेगावमध्ये श्री बनशंकरी देवी मंदीराच्या बांधकामाला वेग ; स्लॅबचे उत्साहात पूजन0 मिनिटे
कडेगाव : येथील हटगर कोष्टी लिंगायत समाजाच्या वतीने , श्री बनशंकरी देवी ट्रस्ट यांच्यामार्फत येथे श्री बनशंकरी देवी मंदीर उभारण्यात येत आहे. या मंदिराच्या स्लॅबचे नुकतेच श्रीफळ वाढवून पूजन करण्यात आले.
यावेळी श्री बनशंकरी देवी ट्रस्टचे अध्यक्ष अनिल तुळसणकर, उपाध्यक्ष अमाेल कारदगे, खजिनदार महेश मिरजकर, सचिव सुरेश एरंडाेले, लिंगायत हटगर काेष्टी समाज कडेगांवचे अध्यक्ष अशाेक कानवडे, ट्रस्टचे सर्व संचालक व सर्व समाज बांधव उपस्थित हाेते.
मंदिराचे बांधकाम अधिक गतीने व्हावे यासाठी या मंदिर बांधकामास दानशूरांनी सढळ हाताने मदत करावी, असं आवाहन ट्रस्ट आणि समाजबांधवांच्यावतीने करण्यात आले आहे.
जाहिरात