क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठातर्फे विट्यात १ ऑगस्टपासून ‘क्रांतिसिंह जयंती सप्ताह’0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव : विटा इथल्या क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठातर्फे दि. १ ते ९ ऑगस्टदरम्यान क्रांतिसिंह जयंती सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. दि. १ रोजी शुभारंभ होईल. दि. ३ रोजी सकाळी आठला क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेची विटा शहरातून मिरवणूक काढण्यात येईल. दि. ६ रोजी ‘क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ वितरण करण्यात येईल. यावेळी ज्येष्ठ मार्क्सवादी नेते कॉम्रेड डॉ. अशोक ढवळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. साम वाहिनीचे मुख्य संपादक संजय आवटी, क्रांती वीरांगना हौसाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होईल. विटा इथल्या क्रांतिसिंह नाना पाटील सभागृहात दुपारी १.३० वाजता हा सोहळा होईल. सप्ताहाचा समारोप ९ऑगस्ट रोजी क्रांतिसिंह नाना पाटील शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असं आवाहन क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठाचे अध्यक्ष भाई सुभाष पवार, संघटक अड. सुभाष पाटील यांनी केलंय.जाहिरात

क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठातर्फे विट्यात १ ऑगस्टपासून ‘क्रांतिसिंह जयंती सप्ताह’

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कडेगावमध्ये श्री बनशंकरी देवी मंदीराच्या बांधकामाला वेग ; स्लॅबचे उत्साहात पूजन

कडेगाव : येथील हटगर कोष्टी लिंगायत समाजाच्या वतीने , श्री बनशंकरी देवी ट्रस्ट यांच्यामार्फत येथे श्री बनशंकरी देवी मंदीर उभारण्यात

Close