भाषणतंत्र शिकणे प्रशासकीय विद्यार्थ्यांना अनिवार्य0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव : भाषण कौशल्य असणे, हे फक्त परीक्षा पास होण्यासाठी आवश्यक नाही. पूर्ण प्रशासकीय कामासाठी ते अत्यंत आवश्यक कौशल्य आहे, असे प्रतिपादन शारदा कॉम्पिटीटीव्ह फोरमचे संचालक चेतन सावंत यांनी केले. ‘सेल्फहूड’ या संस्थेच्या ‘वक्तृत्व प्रशिक्षण कार्यशाळेच्या’ उद्या होणाऱ्या प्रशिक्षणाच्या अनुषंगाने ते ‘कडेगाव-पलूस लाइव न्यूज’शी संवाद साधत होते.

प्रशासकीय सेवांमध्ये जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थांना संवांद कौशल्ये शिकण्यासाठी पुरेसा वेळ देणे व त्यापद्धतीचे मार्गदर्शन उपलब्ध करून देणे आवश्यक झाले आहे. यासाठी, शारदा कॉम्पिटीटीव्ह फोरम वेगवेगळ्या विषयातील तज्ञांची व्याख्याने व प्रशिक्षण आयोजित करत राहील, असे सह-संचालक कौशल धर्मे यांनी सांगितले.

उद्या शारदा कॉम्पिटीटीव्ह फोरम, कडेगाव येथे ११ वाजता ‘वक्तृत्व प्रशिक्षण कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे उदघाटन राज्यसेवा परीक्षेत मुलींमध्ये प्रथम आलेल्या सौ. शुभांगी तानाजी पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

इच्छुकांनी पूर्वनोंदणी केली नसल्यास प्रत्यक्ष शारदा कॉम्पिटीटीव्ह फोरममध्ये कार्यशाळा सुरु होण्याआधी करावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

भाषणतंत्र शिकणे प्रशासकीय विद्यार्थ्यांना अनिवार्य

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठातर्फे विट्यात १ ऑगस्टपासून ‘क्रांतिसिंह जयंती सप्ताह’

कडेगाव : विटा इथल्या क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठातर्फे दि. १ ते ९ ऑगस्टदरम्यान क्रांतिसिंह जयंती सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.

Close