कोयना धरणाचे दरवाजे उघडले !0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email
कोयनानगर (विजय लाड) : पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसानं हजेरी लावल्याने कोयना धरण सध्य स्थितीत 80 % भरले आहे. यामुळे वाढत जाणारी जलपातळी धोकादायक बनू नये यासाठी कोयना प्रकल्पाने धरणाची जलपातळी नियंत्रित करण्याचा प्रयोग चालू केला आहे. जलपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे सहा वक्र दरवाजे 2 फूटाने वर उचलून नदीपात्रात 9,626 क्युसेक्स  तर पायथा वीज गृहातून 2,166 असे एकूण 11,792 क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. यामुळे कोयना नदी दुथडी भरून वाहत आहे. धरण पाणलोट क्षेत्रात 1 जून पासून 3,290 मिमी पाऊस झाला आहे. गत वर्षीच्या तुलनेने सरासरीपेक्षा 27 % जादा पाऊस पडला आहे. दोन महिन्यातच कोयना पाणलोट क्षेत्रात 69 % वार्षिक सरासरी पाऊस झाला आहे.
केवळ दोन महिन्यातच महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणारे कोयना धरण 80 % भरले असून अजून दोन महीने पावसाळा शिल्लक आहे. यामुळे पूरस्थिती निर्माण होवू नये यासाठी कोयना धरणाची जलपातळी नियंत्रित करण्याचा प्रयोग धरण व्यवस्थापनाने शनिवारपासून चालू केला आहे. सकाळी 11.00 वाजता धरणाचे दरवाजे दोन फूटाने वर उचलण्यIत आले. धरणातुन नदीपात्रात 9,626 क्युसेक्स तर पायथा वीज गृहातून 2,166 असे एकूण 11,792 क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यIत येत आहे. यामुळे कोयना नदी दूथडी भरून वाहत आहे. दरम्यान, कोयना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता ज्ञानदेव बागडे यांनी पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्यI पावसाचा आढावा घेवुन धरणातुन सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग कमी करणार असल्याचे सांगितले. कोयना धरणातील पाणीसाठ्याने शतक ओलांडल्यानंतर धरणातील पाण्याचे आमदार शंभुराज देसाई यांच्या हस्ते जलपूजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोयना धरणाचे दरवाजे उघडले !

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
भाषणतंत्र शिकणे प्रशासकीय विद्यार्थ्यांना अनिवार्य

कडेगाव : भाषण कौशल्य असणे, हे फक्त परीक्षा पास होण्यासाठी आवश्यक नाही. पूर्ण प्रशासकीय कामासाठी ते अत्यंत आवश्यक कौशल्य आहे,

Close