मानसशास्त्रीय पद्धतीने वक्तृत्व वेगात शिकणे शक्य: डॉ. गोविंद धस्के0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव : वक्तृत्व ही आता केवळ ‘कला’ म्हणून शाळा-कॉलेजमधल्या स्पर्धेपुरती मर्यादित राहिली नाही तर कोणत्याही क्षेत्रात जर यशस्वी व्हायचे असेल तर वक्तृत्व कला आत्मसात करण्याशिवाय पर्याय नाही. कमी वेळात स्वतःचा प्रभाव पाडायचा असेल तर वक्तृत्व कलेचा मानसशास्त्रीय पद्धतीने अभ्यास आवश्यक असल्याचे मत ‘सेल्फहूड’ चे संचालक डॉ. गोविंद धस्के यांनी व्यक्त केले.

शास्त्रीय पद्धतीने भाषण देण्याची प्रक्रीया व त्याचे परीणाम जाणून घेतले तर अगदी सामान्य व्यक्तीही वेगात प्रभावी वक्ता होऊ शकते असे डॉ. धस्के यांनी स्पष्ट केले. ‘सेल्फहूड’च्या वतीने आणि शारदा कॉम्पिटीटीव्ह फोरमच्या सहकार्यानं आयोजित ‘वक्तृत्व प्रशिक्षण कार्यशाळेत’ ते बोलत होते.

राज्य सेवा परीक्षेमध्ये राज्यातल्या मुलींमध्ये अव्वल आलेल्या प्रशासकीय अधिकारी सौ. शुभांगी तानाजी पाटील यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन झालं. ‘प्रशासकीय सेवेतली आव्हाने पेलण्यासाठी वक्तृत्व ही खूप गरजेची कला आहे’, असं मत यावेळी सौ शुभांगी पाटील यांनी व्यक्त केलं. प्रसिद्ध वक्ते मिथुन माने, ‘कडेगाव पलूस लाइव न्यूज’चे संपादक अर्जुन धस्के, सामाजिक संशोधक सौ. अनामिका धस्के, शारदा कॉम्पिटीटीव्ह फोरमचे संचालक चेतन सावंत तसेच कौशल धर्मे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कडेगावचे नगरसेवक सागर सुर्यवंशी यांनी या कार्यशाळेस सदिच्छा भेट देवून शुभेच्छा दिल्या.

प्रसिद्ध वक्ते मिथुन माने यांनी भाषणाच्या विविध प्रकारांची प्रात्यक्षिके दाखवत प्रशिक्षणार्थींच्या प्रश्नांना उत्तरे दिली. डॉ. गोविंद धस्के यांनी वक्तृत्व कलेचे मानसशास्त्रीय व समाजशास्त्रीय पैलू सांगितले. शास्त्रीय दृष्टीकोनातून वक्तृत्व कलेचा अभ्यास करताना शारीरिक व मानसिक पातळीवर कोणते बदल, तयारी करावी लागते, यावर त्यांनी सविस्तर विवेचन केले.

यापुढेही ‘सेल्फहूड’ ही संस्था या विषयावर सातत्याने मार्गदर्शन करणार असून यात वैयक्तिक समुपदेशन तसेच अत्याधुनिक तंत्राच्या सहाय्यानं मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचं डॉ. धस्के यांनी यावेळी सांगितले.

सातारा, पाटण, इचलकरंजी, कराड, विटा, कडेगाव या परिसरातून मोठ्या संख्येनं मुलामुलींनी या शिबिरात सहभाग घेतला.

 
जाहिरात


 

मानसशास्त्रीय पद्धतीने वक्तृत्व वेगात शिकणे शक्य: डॉ. गोविंद धस्के

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
आण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त कडेगांवमध्ये उद्या विविध कार्यक्रम

कडेगाव : साहित्यरत्न लोकशाहिर आण्णा भाऊ साठे यांच्या जयंती  निमित्त १ ऑगस्ट रोजी सकाळी प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात येणार

Close