‘हॉटेल शिवेंद्र एक्झिक्युटिव्ह’ चे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते येत्या रविवारी उदघाटन0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: अत्याधुनिक सेवा देणारे कडेगाव परिसरातील पहिले हॉटेल ‘हॉटेल शिवेंद्र एक्झिक्युटिव्ह’चे उदघाटन राज्याचे महसूलमंत्री ना. श्री. चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते येत्या रविवारी (६ ऑगस्ट रोजी) होणार आहे. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष मा. पृथ्वीराज देशमुख, सांगली जिल्हा परीषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांची उपस्थिती असेल. सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी मुख्य उद्घाटन समारंभास सुरवात होणार आहे.

मुख्य पाहुण्यांसोबतच तहसीलदार अर्चना  शेटे, उपविभागीय अधिकारी प्रवीण साळुंखे, कडेगावच्या नगराध्यक्षा आकांक्षा जाधव, कडेगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी चरण कोल्हे व कडेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक के. एस पुजारी यांची प्रमुख उपस्थिती असेल.

मुख्य समारंभ नेर्ली फाटा, कडेगाव-कराड रोड, कडेगाव इथे होणार असल्याची माहिती मुख्य निमंत्रक, भाजपचे युवानेते धनंजय चंद्रसेन देशमुख यांनी दिली.

कडेगाव परीसरातील सर्व नागरीक व हितचिंतक यांनी उद्घाटन समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीजय चंद्रसेन देशमुख व उदयकुमार माधवराव देशमुख यांनी केले आहे. 

‘हॉटेल शिवेंद्र एक्झिक्युटिव्ह’ चे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते येत्या रविवारी उदघाटन

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
दारूबंदीचं “एक पाऊल पुढे…” : कडेगावात सह्यांच्या पडताळणीला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

कडेगाव : सर्वपक्षीय एकजुटीतून कडेगावला दारूबंदी होत आहे. या दारूबंदी मोहिमेतला महत्वाचा टप्पा असणारी महिलांच्या सह्यांची पडताळणी सकाळपासून सुरु झाली

Close