‘हॉटेल शिवेंद्र एक्झिक्युटिव्ह’ वेगळ्या चवीतून ओळख निर्माण करेल : मंत्री चंद्रकांतदादा पाटील0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email
कडेगाव : ‘हॉटेल शिवेंद्र एक्झिक्युटिव्ह’ने वेगळ्या चवीतून आपली ओळख निर्माण करावी, अशा शब्दात राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. इथल्या ‘हॉटेल शिवेंद्र एक्झिक्युटिव्ह’चं त्यांच्या हस्ते उदघाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते. माजी आमदार, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, कडेगावच्या नगराध्यक्षा सौ. आकांक्षा जाधव, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या काही आठवणी सांगितल्या. या भागातील अनेक खवय्ये कोल्हापूर, सांगलीला जातात. काही जण तर पुण्याहून कोल्हापूरला जेवणासाठी येतात. त्यामुळे चव हीच कोणत्याही हॉटेलची खरी ओळख असते. ती ओळख हॉटेल शिवेंद्र एक्झिक्युटिव्ह लवकरच मिळवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ज्येष्ठ नेते चंद्रसेन (भाऊ) देशमुख, धनंजय देशमुख, श्रीजय देशमुख, उदय देशमुख यांनी मान्यवरांचं स्वागत केलं आणि आभार मानले.


जाहिरात


 

‘हॉटेल शिवेंद्र एक्झिक्युटिव्ह’ वेगळ्या चवीतून ओळख निर्माण करेल : मंत्री चंद्रकांतदादा पाटील

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कडेगावच्या दत्त पेट्रोल पंपावर गोळीबार करून धाडसी चोरी

कडेगाव : इथल्या नेर्ली फाट्यावरील श्री दत्त पेट्रोल पंपावर काल रात्री तिघा चोरट्यांनी गोळीबार करून धाडसी चोरी केली. चोरट्यांनी रोख

Close