विक्रम महाडीक यांना मारहाण केल्याबद्दल तिघांना तीन वर्षे सक्तमजुरी0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव :  पूर्वीच्या जमीनवादातून शिवाजीनगर  (ता. कडेगाव) येथे एमआयडीसीतील हॉटेल न्यू माधवचे मालक विक्रम विनायक महाडिक (शिवाजीनगर) यांना लाकडी दांडके व तलवारीने हल्ला करून गंभीर जखमी करणा-या प्रकाश भगवान पवार, सुरेश दिनकर पवार व आबासाहेब भगवान पवार (तिघे रा. शिवाजीनगर) यांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विजय घरळ यांनी तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. भगवान रामचंद्र पवार व विक्रम महाडिक या चुलत मामा-भाचांमध्ये जमिनीबाबत वाद सुरु होता. सन २०१२ मध्ये शिवाजीनगर येथे विक्रम महाडिक यांचे बंधू संग्राम महाडिक आणि भगवान पवार यांच्यात एकमेकांकडे खुन्नस देऊन पाहण्याच्या व पूर्वीच्या वादावरून शाब्दिक चकमक झाली. त्याचा राग मनात धरून भगवान पवार यांचा मुलगा प्रकाश, आबासाहेब पवार, सुरेश पवार यांनी संगनमत करून एमआयडीसीतील हॉटेल न्यू माधव येथे जाऊन विक्रम महाडिक यांना लाकडी दांडक्याने डोके, पाठ व उजव्या पायावर मारहाण केली तर आबासाहेब पवारने विक्रम महाडिक यांच्या उजव्या हाताच्या पंजावर तलवारीने हल्ला केला. त्यात महाडिक गंभीर जखमी झाले.

महाडिक यांनी कडेगाव पोलिसांत फिर्याद दिली. हवालदार अधिकराव वनवे यांनी प्रकाश पवार, सुरेश पवार व आबासाहेब पवार यांना अटक केली. वनवे यांनी गुन्ह्याचा तपास करून प्रकाश, सुरेश व आबासाहेब पवार यांच्याविरोधात कडेगाव न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. साक्षीदारांचे जाबजबाब व भक्कम पुरावे मिळाल्याने येथील न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विजय घराळ यांनी तिघांना तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. अॅड. अमित सगरे यांनी सरकारी वकील म्हणून काम पहिले. त्यांना सहायक फौजदार विलासराव साळुंखे व हवालदार ञानेश्वर कावळे यांनी सहकार्य केले.

विक्रम महाडीक यांना मारहाण केल्याबद्दल तिघांना तीन वर्षे सक्तमजुरी

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कडेपूरनजीक एसटी-बोलेरोचा अपघात ; जनार्दन माळी यांचं निधन

कडेगाव : कडेपूर ते पुसेसावळी मार्गावर कडेपूरपासून एक ते दिड किलोमीटरच्या अंतरावर एसटी आणि बोलेरोच्या अपघातात जनार्दन माळी (वय ६०)

Close