उपेक्षितांचा आधारवड डॉ. भीमराव गस्ती यांचं निधन0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कोल्हापूर : समाजातल्या उपेक्षित अशा देवदासींच्या प्रश्नांना वाचा फोडणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यिक डॉ. भीमराव गस्ती यांचं मंगळवारी पहाटे निधन झालं. कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. ते ६७ वर्षांचे होते.

बेळगावमधील यमनापूर हे त्यांचं मूळ गाव. देवदासी ही प्रथा नष्ट व्हावी यासाठी भीमराव गस्ती यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. देवदासी महिलांच्या प्रश्नांसाठी तसंच बेरड-रामोशी समाजाच्या विकासासाठी यमुनापूर इथे ‘उत्थान’ ही संस्था सुरु केली. डॉ. भीमराव गस्ती यांचे काम महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश या तीन राज्यात आहे .

निपाणीमध्ये त्यांनी १८० मुलींसाठी वसतिगृह सुरु केलं. देवदासीच्या प्रथा नष्ट व्हावी यासाठी सामाजिक प्रबोधनाची चळवळ सुरु केली. शेकडो देवदासींचे विवाह केले. त्यांच्या अनेक वर्षांच्या प्रयत्नामुळे देवदासींच्या मुली आता शिक्षण घेऊन शिक्षिका, प्राध्यापिका, तहसीलदार झालेल्या आहेत.

सामाजिक कार्यासह डॉ. भीमराव गस्ती यांनी लेखनही केलं आहे. बेरड समाजाच्या व्यथा, वेदना आणि छळाचं चित्रण करणारं ‘बेरड’ हे त्यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. याशिवाय आक्रोश, सांजवारा ही त्यांची आणखी काही पुस्तकंही प्रसिद्ध आहेत.

उपेक्षितांचा आधारवड डॉ. भीमराव गस्ती यांचं निधन

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
‘हॉटेल शिवेंद्र एक्झिक्युटिव्ह’ वेगळ्या चवीतून ओळख निर्माण करेल : मंत्री चंद्रकांतदादा पाटील

कडेगाव : 'हॉटेल शिवेंद्र एक्झिक्युटिव्ह'ने वेगळ्या चवीतून आपली ओळख निर्माण करावी, अशा शब्दात राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.

Close