कडेपूरनजीक एसटी-बोलेरोचा अपघात ; जनार्दन माळी यांचं निधन0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव : कडेपूर ते पुसेसावळी मार्गावर कडेपूरपासून एक ते दिड किलोमीटरच्या अंतरावर एसटी आणि बोलेरोच्या अपघातात जनार्दन माळी (वय ६०) जागीच ठार झाले. कडेपुरचे प्रसिद्ध डॉ. महेश माळी यांचे ते वडील होत.

आज दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला. पुसेसावळीकडून येणारी पुसेसावळी विटा (एमएच १२–ईएफ ६७५९) या बसचा सोहोलीनजीक आल्यावर स्टेअरिंग रॉड अचानक तुटला. त्यामुळे कडेपूरकडून येणा-या बोलेरोशी (एमएच  १० बीएम–१९३४) अपघात झाला. या अपघातात बोलेरो घेवून निघालेले जनार्दन माळी यांचं जागीच निधन झालं. एसटीचे चालक आणि अन्य ७ प्रवासी जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच कडेगाव पोलीस ठाण्याचे सपोनि शिरतोडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पाटील, कॉन्स्टेबल कुंभार आणि सहकारी यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.जाहिरात


कडेपूरनजीक एसटी-बोलेरोचा अपघात ; जनार्दन माळी यांचं निधन

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
उपेक्षितांचा आधारवड डॉ. भीमराव गस्ती यांचं निधन

कोल्हापूर : समाजातल्या उपेक्षित अशा देवदासींच्या प्रश्नांना वाचा फोडणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यिक डॉ. भीमराव गस्ती यांचं मंगळवारी पहाटे निधन

Close