कडेगाव नगरपंचायत कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email
कडेगाव : कडेगाव नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज काम बंद आंदोलन केलं. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसोबतच नगरपंचायत कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटनेच्या कडेगाव शाखेचे अध्यक्ष श्रीकांत मिसाळ म्हणाले, राज्य सरकारी कर्मचारी आणि आम्ही, यांच्यात सरकार भेदभाव करत आहे, तो अजिबात खपवून घेतला जाणार  नाही.
संघटनेचे कार्याध्यक्ष सदानंद दोडके यांनीही आमच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला. संघटनेच्या सचिव श्रीमती वर्षा धर्मे यांनी, सरकारला आमच्या मागण्या मान्य कराव्याच लागतील, त्याशिवाय आम्ही माघार घेणार नसल्याचे सांगितले. दरम्यान, नगरसेवक सुनील पवार यांनी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून या आंदोलनात आम्ही शेवटपर्यंत कर्मचाऱ्यांसोबतच राहू, अशी ग्वाही दिली.


जाहिरात


 

कडेगाव नगरपंचायत कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कडेपुर अपघातप्रकरणी एसटी चालकावर गुन्हा दाखल

कडेगाव : भरधाव वेगात एसटी चालवून कडेपुरनजीक बोलेरोला धडक दिल्याप्रकरणी एसटी चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत कडेगाव पोलिसांनी दिलेल्या

Close