वडुजच्या मोर्च्यासाठी सांगली जिल्ह्यातुन हजारो बांधव जाणार: आकाश सातपुते0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव : वडुज (ता.खटाव) येथे जनता क्रांती दलाच्यावतीने १६ अॉगस्टला रोजी ” जवाब दो”  मोर्चा वडुज तहसिल कचेरीवर काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी सांगली जिल्ह्यातुन जास्तीत जास्त बांधव मोर्चासाठी घेवुन जाणार असल्याची माहिती जनता क्रांती दलाचे प्रदेश उपाध्यक्ष आकाश सातपुते यांनी दिली.

या मोर्चात लक्ष्मणराव ढोबळे, राजीव आवळे, प्रा. सुकुमार कांबळे हे सहभागी होणार आहेत, मोर्चाचे नेतृत्व जनता क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष सत्यवान कमाने हे करणार आहेत. अनुसूचित जाती आरक्षणामध्ये अ, ब, क, ड असे वर्गीकरण करण्यात यावे, रामोशी समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळाची स्थापना करण्यात यावी, राष्ट्रीयकृत बँकेकडुन मागासवर्गीय तरुणांना कर्ज देण्यासाठी होणारी टाळाटाळ, महिला बचत गट, मायक्रो फायनान्स यांच्याकडुन घेतलेली कर्ज बिनशर्त माफ करावीत, आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.जाहिरात


 

वडुजच्या मोर्च्यासाठी सांगली जिल्ह्यातुन हजारो बांधव जाणार: आकाश सातपुते

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कडेगाव नगरपंचायत कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन

कडेगाव : कडेगाव नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज काम बंद आंदोलन केलं. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसोबतच नगरपंचायत कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन

Close