समाजकारणाचं राजकारण नक्की काय साधणार आहे ?(संपादकीय)0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

सोनहिरा खोऱ्यामध्ये लोककेंद्री सामाजिक न्यायाची परंपरा आहे. एकमेकांच्या चांगल्या-वाईट, साधक-बाधक कामांवर सामाजिक पातळीवर मुक्त चर्चा घडणाऱ्या भारतातल्या मोजक्या भागांमध्ये कडेगाव-पलूस भागाचा समावेश होतो. इथली विद्रोही न्यायाची परंपरा किती जुनी आहे याचा शोध घेणे तसे अवघड काम आहे. लोकन्यायाचं खरं रसायन इथल्या पाण्यातच आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. पण, अलीकडे उद्भवलेल्या राजकीय परंपरेने या सामाजिक न्याय व्यवस्थेला नाही म्हटले तर धक्के देणे सुरु केलंय. आणि त्याचे प्रारूप म्हणजे ‘बाहेरून कॉपी केलेल्या राजकारणाच्या मॉडेल मधून स्थानिक समाजकारणाला दिलेला अर्धविराम’ हे आहे.

‘अत्यंत निष्ठावान पद्धतीने आपापल्या घराण्याची सामाजिक परंपरा जपणे’ याविषयी सजग असणारे राजकारणी अगदीच हाताच्या बोटावर मोजण्याइतके उरलेत. याला सामाजिक किंवा राजकीय अवमूल्यन म्हणणे थोडे धाडसाचे ठरेल कारण अजूनही आधीच्या पिढीतले स्वाभाविक धर्म म्हणून लोकांसाठी धावून जाणारे आदरणीय लोक आजही कर्मरत आहेत. असे असले तरीही समाजकारणाचे बहुतेक सर्वच ठिकाणी राजकारण झाले आहे हे प्रखर वास्तव आहे.

या विशिष्ट समाज-राजकीय अवस्थेचे फलित म्हणजे प्रत्येक किरकोळ घटनेच्या,वाढदिवसाच्या, किरकोळ कामाच्या बातम्या छापून आणण्यासाठी केविलवाणे प्रयत्न करणारी नेतेमंडळी, छोट्या-छोट्या ‘शो’ मधून आपली प्रसिद्धी कशी करता येईल अशी राजकीय कार्यकर्ते मंडळी, आणि काहीच नाही झाले तर किमान व्हाटसपच्या माध्यमातून का हुईना चार ग्रुप वर फोटो टाकणारे तरुण-तडफदार यांची गर्दी. फ्लेक्स प्रदूषणाविषयी काही बोलूच नये अशी अवस्था आहे. त्याहूनही सगळ्यात जास्त कहर म्हणजे पोकळ आणि प्रसंगी खोटारडा असणारा ‘राजकीय श्रेयवाद’. साधं उदाहरण घ्यायचं झालं तर बहुतेक कामे ही फार पूर्वीपासून सुरु असलेली किंवा लोकांच्या चळवळीच्या माध्यमातून मार्गी लागलेली असतात, पण तिथेही अलीकडे बरीच राजकारणी मंडळी आपली ‘वाह वा’ करून घ्यायला धडपडतात. लोकांच्या घटनात्मक पद्धतीने मिळवलेल्या लोकशक्तीला आदर न देणारे दुसरे तिसरे कोणी नसून राजकीय मंडळीच आहेत हे किती दुर्दैवी आहे. अर्थात, हे मायबाप जनतेला अजिबात समजत नाही असं अजिबात नाही.

समाजकारणाच सरसकट राजकारण होणे, हे सामाजिक दृष्ट्‍या कमी दुर्दैवी आहे पण राजकीय दृष्ट्‍या खूपच जास्त नुकसानदायी आहे. राजकारणाची खालावलेली प्रत सुज्ञ मतदारांना सजगपणे मतदान करायला प्रवृत्त करते आणि राजकीय ध्रुवीकरणाला चांगलाच हादरा बसतो असा आजपर्यंतचा अनुभव आहे. फक्त ‘सोशल मिडिया’ व प्रसिद्धी केंद्रित कामकाज करणाऱ्या तरुण राजकारणी मंडळींनी यातून लवकरात लवकर धडा घेणे चांगले. अर्थात ‘समाजकारणाच राजकारण’ वगेरे खोल विषय फक्त ‘लंबी रेस के घोडे’ च समजतात आणि त्यापद्धतीने सुधारणा करतात असा आमचा अभ्यास सांगतो. ज्यास्त काय बोला !जाहिरात


 

One thought on “समाजकारणाचं राजकारण नक्की काय साधणार आहे ?(संपादकीय)

Comments are closed.

समाजकारणाचं राजकारण नक्की काय साधणार आहे ?(संपादकीय)

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
1
Read previous post:
तरुणाईची ‘गर्दी’ थेरपी (संपादकीय)

‘आपल्या पोरांना’ घेऊन ‘युथ पावर’ दाखवल्याशिवाय राजकारणात ‘खुट्टा’ मजबूत होत नाय - हे त्रिकालाबाधित सत्य आधुनिक राजकारणाचा मुख्य मंत्र झाले

Close