स्वातंत्र्य नव्याने शोधताना…0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

अगदी बालपणी होती तशी मजा येत नसली तरी स्वातंत्र्य दिन आणि त्याचा उत्साह कित्येक पिढ्या एकत्रितपणे साजऱ्या करत असतात. टिवीवर अजूनही ब्रिटीश कंपनीने आणि त्यानंतरच्या राणीच्या राज्याने नक्की काय अत्याचार केले, हे फार कमी दाखवले जात असल्याने स्वातंत्र्य आणि त्याचा इतिहास याविषयी बऱ्यापैकी अज्ञान किंवा अपुरी माहिती आहे. इंग्रजांचे राज्य हे ‘ईस्ट इंडिया कंपनी’ नावाच्या एका व्यापारी कंपनीचे होते आणि नंतर ते ब्रिटीश सरकारचे राज्य झाले ही किमान ऐतिहासिक माहिती सुद्धा न जाणणारे नागरीक शोधले तर निश्चित सापडतील. साधारण माहिती म्हणून एक कंपनी देशावर प्रत्यक्ष राज्य करू शकते, हे कितपत पचेल माहीत नाही, पण भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील काही गोष्टी खूप साऱ्या चुकीच्या समजुतीवर प्रकाश टाकतात. अर्थात हे ‘शोधा म्हणजे सापडेल’ या प्रकारात मोडते. माहितीचा अभाव हा फार कमीवेळा देश प्रेमावर प्रभाव टाकतो. स्वतःच्या देशाविषयी निष्ठा ठेवण्यासाठी इतिहास माहीत असण्यापेक्षा स्वतःची मुल्यव्यवस्था मजबूत असणे महत्वाचे असते. अर्थात भारतीयांना हे सर्व नवीन नाहीकिंबहुना देशनिष्ठा आणि मातीशी ईमान हे इथल्या मूलनिवासी जनतेचे जागतिक पातळीवर नावाजलेले वैशिष्ट्य आहे.

सध्या तंत्रज्ञानाने नियंत्रित झालेल्या जागतिक वातावरणात रहात असताना भारताच्या तरुण पिढ्या नक्की कशाप्रकारे स्वातंत्र्याची व्याख्या करतात’ हे समजून घेणेही तितकेच आवश्यक आहे. अगदी काही शतके जुना असणाऱ्या अमेरीकेसारख्या देशात नागरीकांच्या राष्ट्रभक्तीविषयी सतत सर्वेक्षण करून माहिती गोळा केली जाते. इतकेच नव्हे तर अमेरिकेविषयी बाकीच्या देशांत काय भावना आहे, हेही सतत तपासले जाते. भारतात हे लवकरच सुरु होईल आणि मोठ्या प्रमाणात केले जाईल याविषयी शंका नाही. संख्यात्मक देशप्रेम’ तपासणे हे कोणत्याही राष्ट्राच्या अंतर्गत सुरक्षेसाठी आवश्यकच असते परंतु भारतासारख्या कैक शतकांची तत्वज्ञानाचीसाहित्याचीअध्यात्माची परंपरा असलेल्या महान देशामध्ये गुणात्मक स्वातंत्र्य’ ही तितकेच महत्वाचे ठरते. इथला प्रत्येक साहित्यिक मग ते ‘गीतांजलीकार रवींद्रनाथ’ असोत किंवा ‘देशीवादी डॉ. नेमाडे’ असोतहे महान साहित्यिक अत्यंत विशिष्ट प्रकारे घटनात्मक स्वातंत्र्याचे खरे मानवीय’ निकष आणि मर्यादा स्पष्ट करत असतात. अलीकडे बऱ्याच राजकीय व सांस्कृतिक संघटना राष्ट्रवाद’ किंवा सांस्कृतिक व धार्मिक राष्ट्रवादाची परिमाणे व व्याख्या देण्याचा प्रयत्न करतात. त्यात राजकारण किती आणि मूल्यात्मक तत्वज्ञान किती हे भारताची सुजाण जनता तपासायला समर्थ आहेच. पणभारतासारख्या सांस्कृतिकअध्यात्मिक दृष्ट्‍या प्रगत देशामध्ये नक्की स्वातंत्र्य कशाप्रकारे उत्क्रांत होत आहे किंवा व्हायला पाहिजे याचे चिंतन आता अत्यंत आवश्यक झाले आहे.

एका बाजूला जागतिक राजकारण आणि व्यापार यांचा प्रभावचीन-पाकिस्तान सोबत बिघडलेले संबंध व युद्धाची टांगती तलवारभारतीय अर्थकारणाचा मूलाधार असणाऱ्या शेतीची व मोजता येण्यासारख्या अस्सल शेतकऱ्यांची स्थितीदुष्काळ-महापूर यासारखी नैसर्गिक संकटे अश्या अनेक घटकांच्या किचकट वातावरणात महान भारतातील तरुण पिढीला आपला वारसाइतिहासआणि स्वातंत्र्याची खरी’ व्याख्या शोधणे आवश्यक आहे. हे करण्यास आवश्यक ती ऊर्जा व बळ तरुणाईला मिळो, हेच भारतमातेच्या चरणी साकडं !जाहिरात


 


स्वातंत्र्य नव्याने शोधताना…

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
गुन्हेगारीची धोकादायक ‘पार्टनरशिप’

काही दिवसांपासून कडेगाव-पलूस परीसरात होणार्‍या गुन्ह्यांकडे अगदी ओझरता कटाक्ष टाकला तर अगदी सामान्य नागरीकाच्याही लक्षात येईल की इथे घडणाऱ्या गुन्ह्यांचे

Close