पौस का पडना ?0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

पावसाळा सुरु होऊन कैक आठवडे लोटले असले तरी अजूनही दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस अजूनही पडलेला नाही. आषाढ महिन्यात झालेला धोका आणि श्रावण सरींचे गायब होणे हे घाटी महाराष्ट्राला मानवण्यासारखे निश्चितच नाही. नोटाबंदीची डिजिटल क्रांती आणि त्यानंतर आलेला जीएसटी यासारखे बदल यामुळे अर्थव्यवस्थेत तयार झालेले नवीन बदलाचे वातावरण यामुळे आधीच त्रस्त शेतकरी व भारताची ग्रामीण अर्थव्यवस्था यांना नक्की कशाप्रकारे मदत करत आहे, याविषयी मत-मतांतरे असतील, पण निसर्गाने यंदा मांडलेला अत्यल्प पावसाचा खेळ येणाऱ्या काळात नक्की काय ‘वाट’ लावणार आहे, याविषयी सजग होणे आवश्यक आहे. सध्या समस्त जनता सणांच्या तयारीत मग्न असल्याने पर्जन्यमान वगेरे विषय कदाचित वैलावर किंवा मागच्या बर्शन वर गेले असण्याची दाट शक्यता आहे. परंतु, बांधा-बांधावर जाऊन पहिले तर अजूनही चिंतेत असणारा शेतकरी दिसत आहे.

कर्जमाफीचे राजकारण, शेतकरी नेत्यांचे दुर्लक्ष, अस्सल कुणबी विचारसरणीचा अभाव, मुख्य आर्थिक प्रवाहामध्ये खाली जाणारे स्थान या व अश्या अनेक मानवनिर्मित प्रश्नांनी त्रस्त शेतकरी पुनश्च निसर्गाच्या पुढे अगतिक झाला आहे. यावर्षीची हवामानाची विचित्र अवस्था फार कमीवेळा चर्चेत घेतली गेलीय. अगदी सुरवातीला मान्सून लवकर येणार अशी ‘वैज्ञानिक भाकिते’ केली गेली. तंत्रज्ञानाच्या लाटेवर स्वार जनताही बऱ्यापैकी तयारीला लागली परंतु पावसाने पुन्हा एकदा तथाकथित विज्ञानाच्या आणि ते पाळणाऱ्या प्रगतीशील वगेरे समूहांच्या मर्यादा सिद्ध केल्या. अजूनही सध्याची पावसाळ्याची स्थिती अत्यंत गंभीरपणे चर्चेत नाहीये. पावसाळ्याच्या सुरवातीला एकदम जोमात असणारे हवामान खाते नंतर तितक्याच उत्साहाने जनतेसमोर येवून हवामानाची स्थिती स्पष्ट करताना दिसत नाही. याची काही विशेष कारणे निश्चित असणार आणि ती सुद्धा जनतेला लवकरात लवकर माहीत व्हावीत. परंतु, हवामान खात्याची माहिती वेळोवेळी जनतेसमोर येत राहिली तर आणेवारी, दुष्काळाची तयारी, पाणी टंचाई वगेरे सरकार दरबारी जाणारे प्रश्न काहीसे सुलभ आणि मिडिया केंद्रित वाद-विवादामध्ये न पडता व्यवस्थित पोचतील. आपण अजूनही पारदर्शक आणि आधुनिक माहितीवर आधारीत नियोजन व्यवस्था उभारू न शकल्याचे हे निदर्शक नाही ना ?

अगदी सुस्पष्टपणे समोर दिसणारे वास्तव, त्रास, गरीब जनतेचे हाल, शेतकऱ्यांची दुरावस्था अश्यासारखे बरेच प्रश्न वेगवेगळ्या सामाजिक थियरी आणि थिल्लर युक्तिवाद देवून चर्चेतून टाळण्याची विशिष्ट वर्गांच्या प्रवृत्तीने भारताची प्रगती निश्चित साधता येणार नाही. आजपर्यंत पावसाची स्थिती, नैसर्गिक स्रोतांचा दुरुपयोग, देशी मुल्यांवर आधारीत पर्यावरण शिक्षण असे अनेक विषय तितक्या गंभीरपणे चर्चेत घेतले गेले नाहीत. व्हाटसपवर स्माईल कस टाकायचं आणि फुलं कशी पाठवायची याविषयी जेवढे माहितीचे आदान-प्रदान होते त्याचा काही टक्के सुद्धा पावसाविषयी आणि त्याच्या सध्याच्या अवस्थेविषयी चर्चा होत नाही. हे निरोगी आणि सक्षम समाजाचे लक्षण तर नाहीच पण याउलट हे स्वतःल्या खड्ड्यात लोटणाऱ्या ‘शेखचिल्ली’ मनोवृतीचे निश्चितच लक्षण आहे. कदाचित TRP कमी असल्यामुळे पावसाने सुद्धा राजीनामा दिला असण्याची दाट शक्यता आहे, असेही विनोदाने बोलले जाते. एकूणच, जोपर्यंत जनता ‘पौस का पडना ?’ याचा शोध स्वतः लावत नाही तोपर्यंत काहीच कळणार नाही, एवढ निश्चित.जाहिरात


 


पौस का पडना ?

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
स्वातंत्र्य नव्याने शोधताना…

अगदी बालपणी होती तशी मजा येत नसली तरी स्वातंत्र्य दिन आणि त्याचा उत्साह कित्येक पिढ्या एकत्रितपणे साजऱ्या करत असतात. टिवीवर

Close