‘टपोऱ्या’ पावसानं सांगलीला झोडपलं !0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

सांगली (विठ्ठल धर्माधिकारी) : पावसानं दडी मारल्यानं सामान्य नागरीकांची आणि विशेषतः शेतकऱ्यांची ‘दांडी’ गुल होण्याची वेळ आलीय. सारेच चिंतेत असताना आज दुपारी मात्र सांगलीला टपोऱ्या थेंबांच्या दमदार पावसानं सुमारे दोन तास झोडपलं. या पावसानं बळीराजा सुखावला असला तरी सांगलीकरांना मात्र नेहमीप्रमाणंच अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं.

थोडा जरी पाऊस आला तरी सांगलीत पाणी पाणी होतं. या टपोऱ्या थेंबांच्या मुसळधार पावसानं सांगलीची काय अवस्था झाली असेल, याची कल्पनाच केलेली बरी ! स्टेशन चौकासह सांगलीतल्या अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. अशावेळी ‘एसयूव्ही’वाले सुसाट असतात, मात्र सामान्य सांगलीकरांना अतोनात हाल सहन करावे लागतात.

कडेनं चालावं तर धड रस्ताही नाही. महापालिकेनं आता अशा पावसानंतर शहरात असणाऱ्या नागरिकांसाठी किमान होड्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे.



जाहिरात


‘टपोऱ्या’ पावसानं सांगलीला झोडपलं !

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
पौस का पडना ?

पावसाळा सुरु होऊन कैक आठवडे लोटले असले तरी अजूनही दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस अजूनही पडलेला नाही. आषाढ महिन्यात झालेला धोका

Close