कडेगाव पोलिसांनी राबवलं स्वच्छता अभियान0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव : प्रशासकीय सेवकांनी आपल्या कार्यालयाची आणि आवारातील स्वच्छतेची स्वतःच दक्षता घेतली तर जनतेसमोर एक आदर्श निर्माण होऊ शकतो, याचा प्रत्यय आज कडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. एस. पुजारी आणि त्यांच्या सहकाऱ्यानी दिला.

एकीकडे कडेगावमधील काही प्रशासकीय कार्यालये अस्वच्छतेच्या विळख्यात असतानाच पोलीस निरीक्षक के. एस. पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी श्रमदान करून पोलीस ठाण्याचा परिसर स्वच्छ केला. यामुळे श्रमदानाचा संदेश तर पोहोचलाच, परंतु त्याच बरोबर आपले कार्यालय स्वच्छ ठेवण्यासाठी कर्मचारीही आपल्या अशा अभिनव कार्यातून आदर्श निर्माण करू शकतात, हे आज दिसून आले, अशा शब्दात आपल्या सहकाऱ्यांचे पोलीस निरीक्षक के. एस. पुजारी यांनी यावेळी कौतुक केले.

सकाळी साडे सहाच्या सुमारास सर्व कर्मचारी पोलीस ठाण्यात जमा झाले. त्यांनी संपूर्ण आवार स्वच्छ केले. कडेगाव पोलिसांच्या या स्वच्छता मोहिमेचं कडेगाव आणि परिसरात कौतुक होतंय.



जाहिरात


 

कडेगाव पोलिसांनी राबवलं स्वच्छता अभियान

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
तिरक्या बाटलीचं ‘आव्हान’…!!!

कडेगावचे दारूबंदी आंदोलन सध्या एका नव्या 'आव्हाना'चा सामना करत आहे. जे आव्हान अनेक लोकचळवळींचे नुकसान करत आले आहे, अगदी तेच

Close