आदर्श ग्रुपच्या रौप्यमहोत्सवी गणेशाची भव्य तयारी0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव : ‘आदर्श ग्रुप’ च्या श्री. हनुमान गणेश मंडळाचे यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने पाटील वाडा येथे गणेशोत्सवाची भव्य तयारी सुरु असल्याची माहिती संस्थापक विकास भोसले  यांनी दिली.

१९९२ मध्ये शालेय अवस्थेत असणाऱ्या संस्थापक सदस्यांनी सुरु केलेले छोटेखानी मंडळ आज अत्यंत भव्य प्रमाणात गणेश उत्सव साजरा करते. नेहमीप्रमाणे यावर्षीही मंडळाने सोनेरी महालाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती आणि भव्य सजावट, बगीचा तसेच कमानीची आकर्षक रचना केली आहे.

काही दिवसापूर्वी मंडळाच्या भव्य स्टेजचे उद्घाटन माजी सरपंच जाफरभाई पटेल यांचे हस्ते झाले. या कार्यक्रमास गावातील सर्व प्रतिष्टीत मंडळी उपस्थित होती.

मंडळाचे विद्यमान अध्यक्ष रविंद्र सासणे, उपाध्यक्ष बलजीत लाेखंडे, सचिव निलेश लंगडे, प्रवीण पवार, मयूर पालकर व मंडळाचे सर्व कार्यकर्ते या वर्षीचा रौप्यमहोत्सवी उत्सव यशस्वी करण्यासाठी अहोरात्र कार्यरत आहेत.

सामाजिक जबाबदारी म्हणून आदर्श ग्रुप लोकजागरासाठी सामाजिकदृष्ट्या महत्वाच्या घोषणा असणारे पन्नास फुटाचे दोन फ्लेक्स बोर्ड लावणार आहे.

शुक्रवार दिनांक २५ रोजी सकाळी नऊ वाजता स्वागत मिरवणूक निघणार आहे.  मूर्ती प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम संध्याकाळी साडे पाचला असणार आहे.

सर्व भाविकांनी कार्यक्रमास पाटीलवाडा येथे उपस्थित राहावे, असे आवाहन कार्याध्यक्ष हर्शल वाघिरे यांनी केले.जाहिरात


 

 

 

 

आदर्श ग्रुपच्या रौप्यमहोत्सवी गणेशाची भव्य तयारी

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
वाढदिवशी गोरगरीबांना अन्नदान करून आकाशनं ठेवला आदर्श !

कडेगाव : वाढदिवस म्हंटलं  की  तरुणाईची चंगळ असते. शुभेच्छाचा मेसेज सोडला रे सोडला कि पहिला प्रश्न, " भावा, पार्टीचं काय?"...मग

Close