‘लिबर्टी’ यंदा साकारणार संग्राम देशमुख यांच्या शिक्षणविषयक ‘व्हिजन’ चा मेसेज0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: ‘साक्षरता अभियान’ आणि ‘शैक्षणिक प्रगतीच्या माध्यमातून विकास’ चा मेसेज देणाऱ्या ‘लिबर्टी’च्या गणेशमूर्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या शिक्षणविषयक विचाराला सामावणारी मूर्ती कडेगावचे सुप्रसिद्ध मूर्तिकार राजेंद्र दिक्षित घडवत आहेत. आज देशमुख यांनी स्वतः भेट देवून सदर मूर्ती पहिली व मंडळाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले.

या प्रसंगी त्यांच्या सोबत युवा नेते धनंजय (भैय्या) देशमुख,  रविदादा पालकर, विवेक भस्मे, लिबर्टी मंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्रीजय देशमुख (बापू), ठाणे महापौर केसरी पै. अमोल डांगे, पै. महेश जावीर, योगेश डांगे, प्रकाश निरंजन व मूर्तिकार राजेंद्र दिक्षित उपस्थित होते.

आकर्षक मूर्तीसाठी महाराष्ट्रभर प्रसिद्ध असणाऱ्या निवडक मंडळांमध्ये ‘लिबर्टी’ चा खूप वरचा क्रमांक आहे.

गत वर्षीच्या मूर्तीस राज्य पुरस्कार प्राप्त झाल्याने यंदाही लिबर्टी मंडळ कोणत्या प्रकारची विशेष मूर्ती बनवणार याविषयी सर्वत्र उत्सुकता आहे.जाहिरात


 

‘लिबर्टी’ यंदा साकारणार संग्राम देशमुख यांच्या शिक्षणविषयक ‘व्हिजन’ चा मेसेज

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
आदर्श ग्रुपच्या रौप्यमहोत्सवी गणेशाची भव्य तयारी

कडेगाव : 'आदर्श ग्रुप' च्या श्री. हनुमान गणेश मंडळाचे यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने पाटील वाडा येथे गणेशोत्सवाची भव्य तयारी सुरु

Close