कडेगावमध्ये गणेशोत्सवानिमित्त बाजार जागेत बदल0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: सार्वजनिक तसेच घरगुती गणेशमूर्ती नेणे व पर्यायी खरेदी यामुळे होणारी मुख्य पेठेतील गर्दी व संभाव्य समस्या टाळण्यासाठी दर शुक्रवारी भरणारा कडेगावचा आठवडी बाजार उद्या पर्यायी जागेत भरणार आहे. यासंदर्भात कडेगावचे पोलीस निरीक्षक पुजारी यांनी कडेगाव व परीसरातील नागरीकांनी उद्या बाजारासाठी बदली जागेचा वापर करावा असे आवाहन केले आहे.  यासंदर्भात मुख्याधिकारी कोल्हे यांना रितसर कळवण्यात आल्याचे कडेगाव पोलीस ठाण्यातर्फे प्रसिद्ध केलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे.

कडेगावचा बाजार मुख्य पेठेत बसस्थानकापासून शिवाजी चौक परीसरापर्यंत भरतो. उत्सवामुळे सध्या मुख्य पेठेत गणेश मूर्तीं व सजावट विक्रीसाठी तात्पुरती दुकाने बनवण्यात आली आहेत. आजूबाजूच्या ८५ पेक्षा जास्त गावातील छोटे उत्पादक व व्यापारी कडेगाव येथे आठवडी बाजारासाठी जमतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन सार्वजिनक मूर्त्यांच्या मिरवणुकाना अडथळा येवू शकतो यासाठी पर्यायी जागी बाजार भरवला जात आहे.जाहिरात


 

कडेगावमध्ये गणेशोत्सवानिमित्त बाजार जागेत बदल

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
‘लिबर्टी’ यंदा साकारणार संग्राम देशमुख यांच्या शिक्षणविषयक ‘व्हिजन’ चा मेसेज

कडेगाव: 'साक्षरता अभियान' आणि 'शैक्षणिक प्रगतीच्या माध्यमातून विकास' चा मेसेज देणाऱ्या 'लिबर्टी'च्या गणेशमूर्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सांगली जिल्हा

Close