स्पंदन हॉस्पिटलमध्ये २८ ला मधुमेह, ईसीजी, दमा तपासणी मोफत शिबीर0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email
कडेगाव : आपल्या कोणत्याही आजारासाठी एक्सपर्ट डॉक्टरांमार्फत अत्याधुनिक उपचारासाठी आता कराड किंवा पुण्याला जाण्याची गरज नाही, कारण कडेगाव इथं स्पंदन हॉस्पिटलने आपल्यासाठी या सर्व सुविधा उपलब्ध केल्या आहेत. याही पुढं जाऊन सर्वसामान्य रुग्णांना आजारातून मुक्त करण्यासाठी स्पंदन हॉस्पिटलने सिप्ला कंपनीच्या सहकार्याने मधुमेह, ईसीजी, दमा मोफत तपासणी व उपचार शिबीर आयोजित केले आहे. प्रसिद्ध डॉ. सागर पवार (एमडी) ही तपासणी करणार आहेत.
या शिबीरात मधुमेह तपासणी, हृदयाची तपासणी (ईसीजी), दमारोग तपासणी, आहार व व्यायामाबद्दल माहिती देण्यात येणार आहे. दि. २८ ऑगस्ट २०१७ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत हे शिबीर स्पंदन हॉस्पिटल, बसस्टँड मागे, कडेगाव, इथं होणार आहे. शिबिरासाठी नावनोंदणी आवश्यक असून ९९६००९५३३४, ९७६६९६२३३१ या मोबाईल क्रमांकावर तसंच, प्रत्यक्ष भेटून नावनोंदणी करावी.
रुग्णांनी आपली जुनी औषधे आणि केसपेपर सोबत आणावेत,  असं आवाहन करण्यात आलंय. यावेळी स्वाईन फ्लूवरील लसही देण्यात येणार आहे. जास्तीजास्त रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा, असं आवाहन स्पंदन हॉस्पिटल मार्फत करण्यात आलंय.


जाहिरात


 

One thought on “स्पंदन हॉस्पिटलमध्ये २८ ला मधुमेह, ईसीजी, दमा तपासणी मोफत शिबीर

Comments are closed.

स्पंदन हॉस्पिटलमध्ये २८ ला मधुमेह, ईसीजी, दमा तपासणी मोफत शिबीर

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
1
Read previous post:
तालुका इंग्लिश भाषा स्पर्धेत कडेगावच्या उर्दू शाळेचे यश

कडेगाव: येथील जिल्हा परिषद उर्दु शाळेच्या पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय इंग्लिश ल्यान्ग्वेज कॉम्पिटीशन मध्ये कौतुकास्पद यश मिळवले. सर्व शिक्षा अभियान

Close