…अखेर शिवाजी चौकातल्या रस्ता दुरुस्तीला ‘मुहूर्त’0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव : कडेगाव शहरातील रहदारीचं मुख्य ठिकाण असणाऱ्या श्री शिवाजी चौकातील रस्ता दुरुस्तीला अखेर प्रारंभ झालाय. खड्डे पडलेल्या ठिकाणची पाईप बदलण्यात येत असून त्यावर काँक्रीटीकरण होणार आहे, जेणेकरून हा मजबूत रस्ता तयार होईल. इथं पडलेल्या खड्ड्यांमुळे काही अपघात झाले होते. नुकत्याच एका कारचा टायर या खड्ड्यात जाऊन अपघात झाला होता. या अपघाताची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. त्यानंतर हालचाली वाढल्या आणि या कामाला प्रारंभ झाला. या कामामुळं एसटी स्टँड ते शिवाजी चौक, चावडी चौक ही वाहतूक नगरपंचायत मार्गे वळवण्यात आली आहे. सुमारे पन्नास हजार रुपये खर्चाचं हे काम आहे.

यासंदर्भात ‘कडेगाव-पलूस लाईव्ह न्यूज’शी बोलताना मुख्याधिकारी चरण कोल्हे यांनी सांगितले की, नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी युद्धपातळीवर हे काम पूर्ण करण्यात येत आहे. इथल्या रहदारीचा वाढता ताण लक्षात घेता, हे काम अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.जाहिरात

One thought on “…अखेर शिवाजी चौकातल्या रस्ता दुरुस्तीला ‘मुहूर्त’

Comments are closed.

…अखेर शिवाजी चौकातल्या रस्ता दुरुस्तीला ‘मुहूर्त’

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
1
Read previous post:
आली का गौराई?

गौराई उत्सव हा महिलांच्या सांस्कृतिक परंपरेचा आणि स्वाभिमानाचा केंद्रबिंदु आहे. भारतासारख्या मुळच्या मातृसत्ताक आणि त्यानंतर भगिनी-भाऊ नाते संस्कृतीमध्ये परावर्तीत झालेल्या

Close