‘स्पंदन’च्या मोफत आरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव : ‘स्पंदन हॉस्पिटल’ च्या वतीनं आणि सिप्ला कंपनीच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबीराला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. या शिबीरात मधुमेह, हृदयरोग आणि दमा या आजारांबाबत रुग्णाची मोफत तपासणी करण्यात आली. त्यांना पुढील उपचाराबाबत मार्गदर्शनही करण्यात आलं.

कडेगाव आणि परिसरातील ग्रामीण भागातील रुग्णांनी मोठ्या संख्येनं या शिबिराचा लाभ घेतला. शिबीरानंतर ‘कडेगाव-पलूस लाइव न्यूज’शी बोलताना स्पंदन हॉस्पिटलचे डॉ. सागर पवार म्हणाले, या भागातील गोरगरीब रुग्णांना अत्याधुनिक उपचारासाठी आता कराड, सांगली, कोल्हापूरला, पुण्याला जावं लागणार नाही. ‘आयसीयू’ सह सर्व सुविधा अगदी अत्यल्प मोबदल्यात ‘स्पंदन’ मध्ये उपलब्ध आहेत. आज अनेक रुग्णांना या शिबिराच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली. या शिबीराला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता यापुढेही अशी शिबिरं वारंवार आयोजित करून रुग्णांना या अत्याधुनिक सेवेचा लाभ देण्यास आम्ही कटीबद्ध आहोत, असे त्यांनी संगितले.जाहिरात


 

 

‘स्पंदन’च्या मोफत आरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा असणारे ज्येष्ठ नेते पांडुरंग डांगे (बापू) यांचं निधन

कडेगाव : आपल्या धडाडीच्या कार्यशैलीमुळं जिल्ह्याच्या, तालुक्याच्या आणि कडेगावच्या राजकारणात सुमारे पाच दशकांहून अधिक काळ आपला दबदबा निर्माण करणारे ज्येष्ठ

Close