तलाठ्यांचा एक दिवसाचा पगार कापण्यात यावा: आकाश सातपुते  0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: बहुजन क्रांती दलाच्यावतीने कडेगांव तालुक्यात संप करून तलाठ्यांनी सामान्य जनतेला वेठीस धरून त्रास दिला आहे. याबाबत त्यांचा एक दिवसाचा पगार कपात करण्याच्या मागणीचे निवेदन कडेगाव तहसिलदारांना देण्यात आले आहे, अशी माहिती आकाश सातपुते यांनी दिली.

या निवेदनात म्हटले आहे की, कडेगांव उपविभागीय अधिकारी मा. श्री. प्रविण साळुंखे  व तलाठी यांच्यात झालेल्या वादामुळे कडेगांवसह सांगली जिल्ह्यातील तलाठी कर्मचारी संघटनेने जनतेस एक दिवसाचा संप करून जनतेला  वेठीस धरुन दि. २९ ऑगस्टला एक दिवसाचे काम बंद आंदोलन केले. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील लोकांना महसुल कामासाठी विविध दाखले मिळविण्यासाठी वृद्ध, विद्यार्थी, महिला, अशा अनेक लोकांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. प्रांतधिकारी व तलाठी यांच्यामध्ये  वाद  कशासाठी झाला आहे हे सर्वज्ञात असुन कामात कसुर करणे व संप करणे ही खातेअंतर्गत बाब असताना तलाठयांनी हा ‘इगो’ चा मुद्दा बनवून जनतेला वेठीस धरले आहे हे बरोबर नाही, असे सातपुते म्हणाले. तलाठी जनतेचे सेवक आहेत, हे विसरले आहेत.  जनतेचे सेवक आहेत या गोष्टीचा विसर पडल्याने असे प्रकार घडत आहेत, असे सातपुते यांनी स्पष्ट केले.  तलाठी कर्मचाऱ्यांचे बेकायदेशीर आंदोलन केले असुन  त्यांचा एक दिवसाचा पगार कपात करण्यात यावा व  घटनेचा आम्ही जनता क्रांती दलाच्यावतीने निषेध करीत आहे, अशा मागण्यांचे निवेदन नायब तहसिलदार राजेंद्र यादव यांना देण्यात आले आहे.

जनता क्रांती दलाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आकाश सातपुते, सांगली जिल्हाध्यक्ष  संतोष पिसाळ. युवक जिल्हाध्यक्ष अजित पाटोळे, युवक तालुकाध्यक्ष मंगेश कांबळे, अजित वायदंडे, श्रीकांत होलमुखे, गणेश वाघमारे, जयवंत माने, बळवंत पवार आदी निवेदनावर सहया आहेत. याप्रसंगी अनेक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.जाहिरात


 

तलाठ्यांचा एक दिवसाचा पगार कापण्यात यावा: आकाश सातपुते  

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
‘स्पंदन’च्या मोफत आरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

कडेगाव : 'स्पंदन हॉस्पिटल' च्या वतीनं आणि सिप्ला कंपनीच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबीराला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. या

Close