​…एकालाही सोडू नका बाळासाहेब !0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव : युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि युवा नेते डॉ. विश्वजीत कदम यांच्याबाबत पुण्यात लावलेल्या फलकाचे सोनाहीरा खोऱ्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांतुन तर याचा कडाडून निषेध करण्यात येत आहे. सोशल मिडीयाच्या मैदानावर तर रांगड्या भाषेतले शेलके शब्द वापरून फ्लेक्स लावणारांवर जोरदार टीका होत आहे.

सोशल मीडियावर कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, “कोणत्याही काँग्रेस नेत्याने केली नसतील, इतकी आंदोलने डॉ. विश्वजीत कदम यांनी केली आहेत. फ्लेक्स लावणारांचा जेवढा वर्षाचा खर्च नसेल तितकी फी आणि हॉस्पिटल बील आपले नेते महिन्याला माफ करतात. आमचे नेते कार्यक्षम आहेत म्हणूनच मुख्यमंत्री फडणवीस त्यांना ‘ऑफर’ देतात. अशा टीकेमुळं बाळासाहेब थांबणार नाहीत.”

एकूणच या कार्यकर्त्यांच्या संतप्त भावना अधिकच तीव्र होत आहेत. काही दिवसांपूर्वी ‘जाऊ द्या ना बाळासाहेब’ अशा टायटलचा एक चित्रपट खूप चर्चेत राहिला. त्याच धर्तीवर या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की “एकालाही सोडू नका बाळासाहेब!”जाहिरात


 

 

​…एकालाही सोडू नका बाळासाहेब !

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कडेगावमध्ये डोले उभारणीस सुरवात: शतकाहून जुनी मोहरमची ऐतिहासिक परंपरा

कडेगाव: काल बकरी ईदच्या दिवशी सालाबादप्रमाणे डोले बांधणीचा मानकरी मंडळींच्या हस्ते नारळ वाढवून आरंभ करण्यात आला. एका शतकाहून जुन्या कडेगावच्या

Close