​गुलाल तर घेणारच…!0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव : …तसा अजून ‘श्रमपरिहार’ बाकी आहे, पण गुलालाच्या उधळणीत गणरायाला निरोप दिल्यानंतर आता यानंतरचं ‘टास्क’ म्हणजेच ग्रामपंचायत निवडणुकीतही गुलाल घेण्याच्या इराद्यानंच कडेगाव-पलूसमधली तरुणाई पुन्हा सज्ज होत आहे. नेतेमंडळींनी यापूर्वीच ‘रान तापवले’ आहे. त्यात गणेशोत्सव आल्यानं काहीसं थांबलेलं हे ‘धुमशान’ आता पुन्हा सुरू होईल.

थेट सरपंच निवड पक्षांना आव्हान ठरणार आहे. त्यामुळं यातून व्यवस्थित मार्ग काढणाऱ्या ‘राजकीय गुरुं’ चा शोध चालू झालाय. पैशांची दादागिरी आणि दादागिरीचं भांडवल करून निवडणुका जिंकण्याचे दिवस गेले. उलट निवडणूक तंत्राचं शास्त्रीय मार्गदर्शन, सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून गावचीच काय, देशाचीही सत्ता मिळवता येते, हे यापूर्वीच्या निवडणुकीत सिद्ध झालं आहे. ज्यांना हे समजलं, पटलं, ते आता याच मार्गानं तयारीत आहेत.

थेट सरपंच निवडीत आता हाच मार्ग प्रभावी ठरणार आहे, हे सत्य कोणी नाकारू शकत नाही, अशीच चर्चा सध्या राजकीय तज्ज्ञांकडून ऐकायला मिळते आहे. राजकीय मोर्चेबांधणीला तर सुरुवात झालीच आहे, आता कुठला ‘मोहरा’ कुठं टाकायचं, याची खेळी सुरू आहे.

निवडणूक होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींना चांगले ‘मेंबर’, आणि कोणाच्याही हातचं ‘बाहुले’ न बनणारे ‘कर्तबगार’ सरपंच मिळो, हीच ‘लोकशाही’ चरणी प्रार्थना ! बाकी राहीला प्रश्न ‘मतदार राजा’ चा ! त्यांनी मात्र ‘सेनापती’वर विश्वास टाकून राजासारखे राहू नये. डोळे, कान आणि मेंदू चालू ठेवून ‘झिंदाबाद’ म्हणावे, हीच विनंती !

फोटो सौजन्य: www.carecolours.comजाहिरात


 

 

 

​गुलाल तर घेणारच…!

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
​…एकालाही सोडू नका बाळासाहेब !

कडेगाव : युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि युवा नेते डॉ. विश्वजीत कदम यांच्याबाबत पुण्यात लावलेल्या फलकाचे सोनाहीरा खोऱ्यात तीव्र पडसाद उमटत

Close