‘लिबर्टी’ गणेश मंडळाचा सामाजिक सुधारणेचा गणेशोत्सव संकल्प0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: ऐतिहासिक ‘लिबर्टी’ गणेश मंडळाने नेहमीप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर न देता यावर्षी सामाजिक सुधारणांच्या पुरस्काराच्या माध्यमातून मंडळाची कार्यवाही पार पडली व पुढील वर्षी याहून अधिक सामाजिक पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा संकल्प सोडला.

गतवर्षी आपल्या विशिष्ट मूर्तीकलेच्या नमुन्यासाठी राज्य शासनाचे पारीतोषिक मिळवलेल्या लिबर्टीने यंदा दुष्काळी परीस्थितीच्या अनुषंगाने अनावश्यक खर्च टाळला व सामाजिक सुधारणांचा एक आदर्श समोर ठेवला. यावर्षी मंडळाने संग्रामसिंह देशमुख यांच्या ‘शैक्षणिक व्हिजन’चे प्रतिबिंब असणारी आकर्षक गणेश मूर्ती तयार केली होती.

पुढील वर्षी लिबर्टी अनेक सामाजिक उपक्रम राबवेल आणि नवा आदर्श निर्माण करेल, असे मंडळाचे अध्यक्ष श्रीजय देशमुख यांनी सांगितले.

मंडळाच्या आजपर्यंतच्या परंपरेनुसार पुढील वर्षीही अत्यंत ‘वेगळी’ व प्रबोधनात्मक मेसेज देणारी मूर्ती स्थापन केली जाईल, असे मंडळाच्या अध्यक्षांकडून स्पष्ट करण्यात आले.जाहिरात


 

‘लिबर्टी’ गणेश मंडळाचा सामाजिक सुधारणेचा गणेशोत्सव संकल्प

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
राजाराम शिंदे ‘सरकार’: समाजसेवेचा वेगळा आदर्श

निमंत्रित विशेष लेख लेखक: चेतन सावंत नेर्ली सर्व सेवा सोसायटीचे चेअरमन राजाराम शिंदे ‘सरकार’ हे नाव कडेगाव-पलूस परीसरात सामाजिक विकासाच्या

Close