राजाराम शिंदे ‘सरकार’: समाजसेवेचा वेगळा आदर्श0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

निमंत्रित विशेष लेख

लेखक: चेतन सावंत

नेर्ली सर्व सेवा सोसायटीचे चेअरमन राजाराम शिंदे ‘सरकार’ हे नाव कडेगाव-पलूस परीसरात सामाजिक विकासाच्या प्रक्रीयेत अग्रणी म्हणून ओळखले जात आहे. काहीसे दुर्लक्षित राहिलेले त्यांचे सामाजिक योगदान अलीकडे सर्वांच्या चर्चेत येत आहे. कारण, ते योगदान समाजाच्या गरजेला अचूकपणे मदत करणारे आहे.

 

ग्रामपरीवर्तन व ग्रामविकासाचे सर्वात महत्वाचे साधन म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढवणे. दुर्लक्षित अश्या ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्रामध्ये जेवढी आवश्यकता शाळेसाठी वेगवेगळ्या साधनांची असते तेवढीच आवश्यकता गरीब मुलांना वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या मदतीची असते. नेमक्या याच परिस्थितीची जाणीव ठेवून राजाराम शिंदे ‘सरकार’ मागील पाच वर्षापासून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करीत आहेत. ‘सरकार’ स्वतः अत्यंत हालाकीच्या परीस्थितीतून संघर्ष करीत एक यशस्वी उद्योजक म्हणून नावारुपास आले आहेत. आणि, याच प्रवासातून त्यांना आलेले अनुभव आज त्यांच्या सामाजिक कार्याचा मूलाधार आहेत.

मातीशी घट्ट नात असल्याने आणि आपण ज्या गावातुन आलो त्यासाठी काहीतरी करावं ही जबाबदारीची भावना कायम अंगी असल्या कारणाने आजवर त्यांनी अनेक समाजपयोगी कामे केली आहेत. नेर्ली सारख्या विकासवादी गावामध्ये आपली सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी अत्यंत कौतुकास्पद योगदान दिले आहे. ज्या ज्या वेळेला नेर्लीच्या शैक्षणिक वर्तुळात आर्थिक किंवा इतर प्रकारच्या गरजा निर्माण झाल्या त्या त्या वेळेस ‘सरकार’ यांनी पुढे येवून शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, वह्या, शाळेसाठी प्रिंटर उपलब्ध करून दिले. अगदी अलीकडे शाळेच्या डागडुजीचे काम त्यांनी हाती घेतले. पोकळ भाषण आणि फ्लेक्सबाजीच्या जमान्यात राजाराम शिंदे ‘सरकार’ यांच्या रुपाने कार्यशील ग्रामीण भागात शैक्षणीक तसेच सामाजिक नेतृत्व उभे रहात आहे.

आपल्या सामाजिक योगदानाविषयी बोलताना ‘सरकार’ उपकाराची कोणतीही भावना मनात न ठेवता स्वतःची सामाजिक जबाबदारी अधोरेखीत करतात. इथून पुढच्या काळात सुद्धा ‘सरकार’ शिक्षण व सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.जाहिरात


 

 

राजाराम शिंदे ‘सरकार’: समाजसेवेचा वेगळा आदर्श

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
​गुलाल तर घेणारच…!

कडेगाव : ...तसा अजून 'श्रमपरिहार' बाकी आहे, पण गुलालाच्या उधळणीत गणरायाला निरोप दिल्यानंतर आता यानंतरचं 'टास्क' म्हणजेच ग्रामपंचायत निवडणुकीतही गुलाल

Close