बेकायदा वाळू उपसाप्रकरणी कडेगांव तहसिलदारांची चौकशी करा: जनता क्रांती दलाची मागणी0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगांव : कडेगांव येथे जनता क्रांती दलाच्यावतीने उपजिल्हाधिकारी राजेंद्र कचरे यांना निवेदन देण्यात आले, या निवेदनात म्हटले आहे की, कडेगांव तहसिलदार व काही तलाठी यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणावर वाळु ठेकेदारांनी बेकायदेशीर वाळु उपसा केला आहे. त्याच्या बदल्यात तहसिलदार यांनी बरीच माया जमा केली आहे. काही सामाजिक संघटनांनी वेळो- वेळी तोंडी व लेखी निवेदन देऊन अनेक बेकायदेशीर कामांची चौकशी करावी, कारवाई करावी असे सांगीतले होते. परंतु निवेदनांचा विचार न करता आर्थिक आमिषापोटी मँडमनी कोणतीही कार्यवाही केली नाही. तर त्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार अनेक वेळा उघड झाला आहे. एखाद्या वरीष्ठ अधिकाऱ्याने बोलण्याचा, कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर संघटनेचा दबाव टाकुन सक्तीच्या रजेवर जावे लागते. ही खेदाची बाब आहे. त्यामुळे वाळु सम्राटांचे धाडस वाढत गेले आहे.

जिल्हाधिकारी यांनी धाडी टाकुन केलेली कारवाई स्वागतार्ह आहे. परंतु वाळु ठेकेदारांना नुसते जबाबदार धरुन चालणार नाही, तर तहसिलदार व संबधित तलाठी यांनाही तेवढेच जबाबदार धरणेत यावे, व तलाठ्यांना दंड करणेत येऊन तहसिलदार यांची खातेनिहाय चौकशी करुन जोपर्यंत चौकशी पुर्ण होत नाही, तोपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे. बेकायदेशीर वाळु उपसा करण्यास  पाठबळ दिल्याप्रकरणी खातेअंतर्गत चौकशी करावी व जोपर्यंत चौकशी पुर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे, अन्यथा जनता क्रांती दलाच्यावतीने कडेगांव तहसिल कचेरी येथे बुधवार दि. १३ पासुन बेमुदत धरणे आंदोलन करणेत येईल, असा ईशारा देण्यात आला आहे.

सदर निवेदन उपजिल्हाधिकारी राजेंद्र कचरे यांना देण्यात आले. निवेदनावर जनता क्रांती दलाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आकाश सातपुते, जिल्हाध्यक्ष संतोष पिसाळ, युवक जिल्हाध्यक्ष अजित पाटोळे, युवक तालुकाध्यक्ष मंगेश कांबळे, अजित वायदंडे, श्रीकांत होलमुखे, गणेश वाघमारे, दिपक वाघमारे, सुरज कांबळे यांच्या सह्या आहेत.जाहिरात


 

 

बेकायदा वाळू उपसाप्रकरणी कडेगांव तहसिलदारांची चौकशी करा: जनता क्रांती दलाची मागणी

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
राजेंद्र गणपती हासबे यांचे निधन

कडेगाव: येथील राजेंद्र गणपती हासबे (मोरे) वय ३५, यांचे अल्पशा आजाराने  निधन झाले. अनेक समाजिक कामामध्ये त्यांचा सहभाग होता व

Close