यशवंतरावांच्या जन्मभूमीतच माणुसकीचे धिंडवडे !0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव : ज्यांनी सहकाराचा पाया भक्कम करून ख-या अर्थानं गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत सत्ता पोहोचवली, त्या आदरणीय यशवंतराव चव्हाण यांच्या भूमीतच माणुसकीचे धिंडवडे काढले जात आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्याच नावानं सुरु असणा-या सोसायटीतील राजकारणाचा बळी ठरलेल्या महिला क्लार्कचा वर्षभर पगारच देण्यात आला नाही. इतकेच नव्हे तर स्वतः नोकरी करून शेतकी पदवीचे शिक्षण घेणा-या या युवतीचा पगार न मिळाल्यानं तिला आपलं शिक्षणही अर्ध्यातच थांबवावं लागलं. यासंदर्भात शक्य तितके प्रयत्न करून झाले, मात्र कोणत्याच कायद्याला आणि वरिष्ठांच्या आदेशाला या सोसायटीचे विद्यमान संचालक मंडळ भीक घालत नसल्याने या आडमुठेपणाची परिसरात जोरदार चर्चा आहे. दरम्यान या संदर्भात लवकरच राज्य महीला आयोगाकड तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे समजते. आदरणीय यशवंतराव चव्हाण यांच्याच जन्मभूमीत, त्यांच्याच नावानं गोरगरिबांच्या उद्धारासाठी स्थापन झालेल्या सहकारी सोसायटीत एका महीला कर्मचा-याची एक वर्षापासून आर्थिक पिळवणूक सुरु असूनही जिल्ह्यातील सर्वपक्षीय जबाबदार नेते आणि अधिका-यांनी गांधारीची भूमिका घेतल्यानं या प्रकारची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

याबाबत निवेदनातून मिळालेल्या माहितीनुसार, देवराष्ट्रे इथल्या यशवंतराव चव्हाण वि. का. स. सोसायटीत कु. शीतल धोंडीराम महिंद या क्लार्क पदावर सन २०११-१२ पासून काम करत आहेत. या दरम्यान सोसायटीत सत्तांतर झाले. त्यानंतर त्यांचा पगार न देण्याचा निर्णय नव्या संचालक मंडळानं एका बैठकीत घेतल्याची माहिती संस्थेचे सचिव हणमंत मोहिते यांनी ‘कडेगाव-पलूस लाईव न्यूज’ला दिली. मे २०१६ पासून त्यांचा पगार देण्यात आलेला नाही. मात्र राजकारणाच्या या खेळात या युवतीचे भविष्य उध्वस्थ होण्याची वेळ आलीय. नोकरी करून शिक्षण घेणा-या या युवतीचा पगार न दिल्यामुळ कृषी पदवीचे शिक्षण घेणा-या या युवतीचे शिक्षण थांबले आहे. घरी मोलमजुरी करणारे आई-वडील आणि शिक्षण घेणारे भाऊ यांचा भार कसा पेलावा, याचा प्रश्न सध्या या युवतीसमोर आहे. यासंदर्भात न्याय मागण्यासाठी शक्य ती दारे ठोठावण्यात आली. मात्र कोणत्याच पत्राला सध्याचे संचालक जुमानत नाही. सुनावणीला हजर रहात नाही.

आपल्या प्रत्येक भाषणाची सुरुवात यशवंतराव चव्हाण यांच्या नावानं करणा-या राजकीय नेतेमंडळीनीही या प्रकाराकड दुर्लक्ष केल्यामुळ आता या युवतीला राज्य महिला आयोगाकड आर्थिक पिळवणूकीची तक्रार करण्याशिवाय पर्याय नसल्याची माहिती देण्यात आली.जाहिरात


 

 

यशवंतरावांच्या जन्मभूमीतच माणुसकीचे धिंडवडे !

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
बेकायदा वाळू उपसाप्रकरणी कडेगांव तहसिलदारांची चौकशी करा: जनता क्रांती दलाची मागणी

कडेगांव : कडेगांव येथे जनता क्रांती दलाच्यावतीने उपजिल्हाधिकारी राजेंद्र कचरे यांना निवेदन देण्यात आले, या निवेदनात म्हटले आहे की, कडेगांव

Close