बस मोबाईल दुकानास धडकल्याने अपघात0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

येथील बसस्थानक आवारात आज सकाळच्या सुमारास बस मागे घेत असताना अपघात घडला. कडेगाव ते खेराडे वांगी या मार्गावर धावणारी बस (एम एच १२ ई एफ ६७८७) मागे घेतली जात असताना बसस्थानक आवारात असणाऱ्या मोबाईलच्या दुकानावर जाऊन आदळली.

ह्यांडब्रेक न लागल्याने गाडीचे नियंत्रण सुटले असल्याचा प्राथमिक अंदाज बोलला जात आहे, परंतु, याविषयी अजून अधिकृत दुजोरा मिळाला नाही.

या अपघातामुळे मोबाईल दुकानाच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. सकाळपासून इथे बघ्यांची गर्दी जमल्याने बसस्थानकाच्या वाहतुकीस अडथळा होत होता.

अपघात झालेले वाहन हलवण्यात आले असून बस स्थानकाचे काम पूर्ववत सुरु असल्याचे वाहतूक नियंत्रक देशमुख यांनी सांगितले.

 

बस मोबाईल दुकानास धडकल्याने अपघात

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
वृक्षमित्र धों म मोहिते पर्यावरण संवर्धन पत्रकार पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

देवराष्ट्रे: येथील सागरेश्वर अभयारण्याच्या रम्य परीसरात एका नैसर्गिक आणि ग्रामीण साहित्य सोहळ्यामध्ये आज वृक्षमित्र धों म मोहिते पर्यावरण संवर्धन पत्रकार

Close