जनता क्रांती दलाच्या वाळू तस्करी विरोधी लढ्याला यश0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: जनता क्रांती दलाच्या वाळू तस्करी विरोधी लढ्याला अंशतः का होईना यश आले आहे.  मागील आठवड्यात जनता क्रांती दलाने वाळू तस्करी विरोधात कडेगाव तहसीलदार यांच्या कामाच्या पद्धतीबाबत आंदोलन करून चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी त्वरीत प्राथमिक चौकशी करून ११ कोटी रुपयांचा दंड केला.  मागच्या आठवड्यात देण्यात आलेल्या निवेदनात कडेगाव तहसिलदारांच्या खातेनिहाय चौकशीसाठी  जनता क्रांती दलाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आकाश सातपुते यांनी मागणी केली होती. तहसिलदार यांची चौकशी झाली नाही तर जनता क्रांती दल या संघटनेच्यावतीने १३ तारखेपासून बेमुदत आंदोलनाचा ईशारा जनता क्रांती दलाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आकाश सातपुते यांनी दिला होता.

सध्या जिल्हाधिकारी यांनी केलेली कारवाई हे अंशिक यश आहे असे मत सातपुते यांनी व्यक्त केले. नुसती चौकशी करुन चालणार नाही, तर जो दंड वाळु तस्करांना झालाय तेवढाच दंड त्यांना झाला पाहिजे, व तहसिलदार व तलाठ्यांच्या मालमत्तेची चौकशी झाली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने जनतेला न्याय मिळु शकतो, असे सातपुते यांनी स्पष्ट केले.

जनता क्रांती दलाने एकहातीआंदोलन करून कारवाईची मागणी केली होती.

 

जनता क्रांती दलाच्या वाळू तस्करी विरोधी लढ्याला यश

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
बस मोबाईल दुकानास धडकल्याने अपघात

येथील बसस्थानक आवारात आज सकाळच्या सुमारास बस मागे घेत असताना अपघात घडला. कडेगाव ते खेराडे वांगी या मार्गावर धावणारी बस

Close