विट्यात उद्या सेल्फहूड ची वक्तृत्व प्रशिक्षण कार्यशाळा0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: येथील सेल्फहूड या सर्वांगीण प्रशिक्षण संस्थेद्वारा उद्या विटा इथे ‘वक्तृत्व कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली आहे. विटा येथील ‘एम डी सोल्युशन्स’ या संगणक प्रणाली व आधुनिक माहिती तंत्रज्ञान सुविधा पुरवणाऱ्या खाजगी संस्थेद्वारा येत्या रविवारी (१७ सप्टेंबर)  या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

या एक दिवसीय कार्यशाळेमध्ये वक्तृत्व कौशल्याची समाजशास्त्रीय व मानसशास्त्रीय पद्धतीने ओळख करून देण्यात येणार आहे. याचबरोबर, प्रभावी भाषण प्रक्रीयेचे वेगवेगळे घटक जसेकी भाषण लेखन, सादरीकरणाची पद्धती, देहबोली, वेशभूषा, भाषेचा अचूक आणि प्रभावी वापर, भीती व गोंधळावर मात अश्या विविध गोष्टीवर विडीओ व माहिती तसेच गट-चर्चा इत्यादी माध्यमातून माहिती देण्यात येणार आहे.

विटा व परीसरातील ग्रामीण भागातील युवक, युवानेते, सामाजिक कार्यकर्ते, हौशी व्यावसायिक व विद्यार्थी इत्यादी घटकांना वक्तृत्व कौशल्याची शास्त्रीय ओळख व्हावी यासाठी ही कार्यशाळा जाणीवपूर्वक आयोजित करत असल्याची माहिती एम डी सोल्युशन्सचे मुख्य कार्यकारी प्रसाद बिरंगे यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, ‘एका दिवसात वक्तृत्व शिकणे ही अशक्य बाब आहे, पण डॉ. गोविंद धस्के यांसारख्या आंतरराष्ट्रीय भाषण तज्ञ संशोधकांकडून वक्तृत्वाची तंत्रे समजून घेतल्यास भाषण शिकण्याच्या प्रयत्नांना अचूक दिशा व चालना मिळेल, या हेतूने ही कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे.

सध्या सुरु असलेल्या ग्रामपंचायत इलेक्शन च्या अनुषंगाने ग्रामीण भागातील तरुण नेत्यांना या कार्यशाळेमधून खूप नवीन गोष्टी शिकायला मिळतील’, असे त्यांनी सांगितले.  सर्वांसाठी ५०० रुपये फी असून विद्यार्थ्यांसाठी सवलत म्हणून ३०० रुपये फी ठेवण्यात आली आहे.

शालेय तसेच कॉलेजवयीन विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा जरुर फायदा घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यशाळेस फी भरून नाव नोंदणी करण्यासाठी ९५०३२३१७९२ या नंबरवर कॉल करावा.

सदर कार्यशाळा येत्या रविवारी १७ सप्टेंबरला मायणी रोड येथील ‘ विटा यंत्रमाग औद्योगिक सहकारी संघा’च्या सभागृहामध्ये ११ ते ५ या वेळेत होणार आहे.

 

विट्यात उद्या सेल्फहूड ची वक्तृत्व प्रशिक्षण कार्यशाळा

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
जनता क्रांती दलाच्या वाळू तस्करी विरोधी लढ्याला यश

कडेगाव: जनता क्रांती दलाच्या वाळू तस्करी विरोधी लढ्याला अंशतः का होईना यश आले आहे.  मागील आठवड्यात जनता क्रांती दलाने वाळू तस्करी

Close