श्रमदानातून स्वच्छ झालं वैकुंठधाम…याला म्हणतात सामाजिक काम !0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव : कडेगाव नगरीचा विकास ही आता केवळ शासकीय किंवा राजकीय बाब राहिली नसून ती एक लोकचळवळ होत आहे. याचीच प्रचीती इथल्या सुजाण नागरिकांनी आज दिली. प्रत्येकाचं जीवन अनेक अनिष्ठ बाबींसोबत व्यतीत होत असतं. किमान या जगाचा अखेरचा निरोप घेताना तरी अनिष्ठ, अस्वच्छ विचारांची संगत सुटावी आणि स्वच्छ, पवित्र वातावरणात आपल्या एका जीवलगाला पंचत्वात विलीन करताना, “आम्ही जातो अमुच्या गावा…” हे शब्द तितक्याच पवित्र भावनेनं मनामनातून उमटावेत, याच शुद्ध हेतूनं कडेगाव इथल्या वैकुंठधाम स्मशानभूमीची नागरिकांनी स्वच्छता केली.

योगगुरू पाटील गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांनी हा सामाजिक उपक्रम आज सकाळी राबवला. सध्या कडेगावला स्मार्ट सिटी करण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर चर्चा चालू आहे. चांगले विचार व्यक्त होत आहेत. अर्थात या विचारांना कृतीची जोड देवून एक चागली सुरुवात करण्याचा आदर्श या उपक्रमानं निर्माण केला आहे. या मोहिमेत सहभागी सर्वांचं “कडेगाव-पलूस लाईव न्यूज’ परिवारातर्फे मनापासून अभिनंदन !

 

श्रमदानातून स्वच्छ झालं वैकुंठधाम…याला म्हणतात सामाजिक काम !

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
विट्यात उद्या सेल्फहूड ची वक्तृत्व प्रशिक्षण कार्यशाळा

कडेगाव: येथील सेल्फहूड या सर्वांगीण प्रशिक्षण संस्थेद्वारा उद्या विटा इथे 'वक्तृत्व कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळा' आयोजित करण्यात आली आहे. विटा येथील

Close