दारूबंदी सह्यांच्या फेरपडताळणीवर कडेगावकरांचा कडकडीत बहीष्कार !0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव : कडेगावची दारूबंदी मोहीम अंधाधुंद प्रशासकीय कारभाराच्या कचाट्यात सापडली आहे. सह्यांची पडताळणी पूर्ण होवूनही अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळ दोन वेगवेगळ्या सह्यांच्या संख्या जाहीर करण्यात आल्या. यासंदर्भात फेरपडताळणीची पहिली तारीख नेमकी गौरी-गणपतीच्या सणात घेण्यात आली.  सणामुळ जास्तीजास्त महिला यासाठी येणार नाहीत, याच हेतूनं हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे. हा निर्णय नागरिकांच्या दबावामुळ रद्द झाला. आज पुन्हा ही प्रक्रिया घेण्यात आली. मात्र नागरिकांनी त्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. अनेक ग्रामस्थांना तर आजच्या या प्रक्रियेची माहितीही नसल्याचं दिसून आलं. त्यामुळं सर्व टेबल मांडून महिलांची वाट पाहणाऱ्या उत्पादन शुल्कच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपापसात गप्पा आणि मोबाईलशी खेळत बसण्याशिवाय काहीच काम नव्हत. दरम्यान, सह्या पडताळणीत काय घोळ झालाय, याबाबत उत्पादन शुल्कच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल मागितला असल्याचं समजत. त्यामुळं आता कडेगावच्या दारूबंदीचा पुढील प्रवास सर्वस्वी जिल्हाधिकारी यांच्या निर्णयावर अवलंबून असल्याचे दिसते.

दारूबंदी सह्यांच्या फेरपडताळणीवर कडेगावकरांचा कडकडीत बहीष्कार !

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
थेट सरपंच निवडीचा लोकशाहीवर सकारात्मक परिणाम ! (विशेष संपादकीय)

कडेगाव-पलूस परीसर हा गेल्या तीन दशकापासून विशिष्ट पद्धतीच्या राजकीय ध्रुवीकरणाने ग्रासला आहे. वरकरणी भलेही राजकीय पक्ष म्हणून दोन राष्ट्रीय पातळीवर

Close