गौरी लंकेश यांच्या हत्येचा कडेगावमध्ये बसव ब्रिगेड तर्फे निषेध0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: बसव ब्रिगेडच्या कडेगाव तालुका व शहर शाखेतर्फे गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली व तहसीलदार अर्चना शेटे यांना सह्यांचे निवेदन देण्यात आले.

बसव ब्रिगेड च्या शहर कार्यालयात गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध करणारी सविस्तर भाषणे करण्यात आली.

याप्रसंगी बोलताना तालुका अध्यक्ष श. संदीप माळी यांनी लिंगायत धर्मातील विचारवंतांच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली व प्रशासनाने यासंदर्भात कडक पाउल उचलावे अशी विनंती केली.

तालुका शाखेचे सचिव श. प्रशांत विभूते यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी बोलताना विभूते म्हणाले की विचारवंताच्या संरक्षणाची जबाबदारी सर्वांची आहे आणि यामध्ये विरोधाचा दृष्टीकोन टाळणे आवश्यक आहे.

शहर शाखेचे अध्यक्ष श. हर्षल वाघिरे यांनी गौरी लंकेश यांचे पत्रकारीतेमधील तसेच लिंगायत धर्माच्या अभ्यासामध्ये असलेले योगदान स्पष्ट करत श्रद्धांजली वाहिली.

शहर शाखेचे सचिव श. अधिक तडसरे यांनी गौरी लंकेश यांच्या कामाची प्रेरणा मोठी असून त्यापासून सर्व लिंगायतांनी आदर्श घ्यावा असे सांगितले.

यानंतर, गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध करणारे कडेगाव शहर व तालुक्यातील लिंगायत धर्मियांच्या सह्यांचे निवेदन तहसीलदार सौ. अर्चना शेटे यांना देण्यात आले. याप्रसंगी श. किरण महादेव माळी, श. कार्तिक नानासो माळी, योगेश नामदेव माळी, अनिल शिवाजी माळी, अक्षय आनंदा माळी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जितेंद्रसिंह रजपूत, संतोष चौरे तसेच बसव ब्रिगेड चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

गौरी लंकेश यांच्या हत्येचा कडेगावमध्ये बसव ब्रिगेड तर्फे निषेध

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
दारूबंदी सह्यांच्या फेरपडताळणीवर कडेगावकरांचा कडकडीत बहीष्कार !

कडेगाव : कडेगावची दारूबंदी मोहीम अंधाधुंद प्रशासकीय कारभाराच्या कचाट्यात सापडली आहे. सह्यांची पडताळणी पूर्ण होवूनही अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळ दोन वेगवेगळ्या

Close