कडेगावच्या डोल्यांची सांगता भावपूर्ण वातावरणात0 मिनिटे
कडेगाव: ऐतिहासिक डोल्यांची सांगता आज कडेगावमध्ये अत्यंत भावपूर्ण वातावरणात झाली.
सुरवातीला ग्रामस्थांची मिटिंग झाली ज्यामध्ये यावर्षीच्या डोल्यांमधील महत्वपूर्ण विषयांवर साधक-बाधक चर्चा करण्यात आली.
गावातील ज्येष्ठ नागरीक व नेते तसेच युवा नेत्यांनी आपापली भूमिका गावकऱ्यांपुढे मांडली.
यामध्ये प्रामुख्याने ताबुतांची कळस व झेंडा यांची एकूण उंची याविषयीचे निकष तसेच ताबूत भेटीची वेळ यावर चर्चा झाली व निर्णय घेण्यात आले.
त्यानंतर मुख्य धार्मिक प्रार्थना होऊन ‘तबरूक’ वाटण्यात आला. याप्रसंगी अत्यंत भावपूर्ण वातावरण पाहायला मिळाले.
यानंतर , उंच ताबुतांचे सोडवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आज दिवसभरात मुख्य ताबूत सोडवून पुढील वर्षासाठी जपून ठेवण्यात येतील.
कडेगावचे डोले धार्मिक ऐक्यासाठी जागतिक पातळीवर प्रसिध्द असून लांबून लोक येथील गगनचुंबी ताबुतच्या भेटी पाहण्यासाठी येत असतात.