शिवसेना पलूस तालुका प्रमुखपदी प्रशांत लेंगरे0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

पलूस: अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या तालुका प्रमुखपदाच्या खुर्चीवर आज प्रशांत लेंगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सेना कार्यालाकडून पदाधिकारी नियुक्तीची प्रक्रीया पार पडली. प्रशांत लेंगरे हे आघाडीचे तरुण शिवसैनिक म्हणून पलूस तालुका तसेच जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत.

वाळूची तस्करी, येरळा नदीची वाताहत, भेसळयुक्त पेट्रोल विक्री अश्या अनेक प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी आंदोलने करून आणि निवेदन देवून पाठपुरावा केला आहे.

 

निवडीनंतर ‘कडेगाव-पलूस लाईव न्यूज’ शी बोलताना लेंगरे यांनी सांगितले की, मा. उद्धव ठाकरे यांचे शाखा विस्ताराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान करून प्रयत्न करणार आहे व त्यासाठी शिवसैनिकांना एकत्रित घेऊन पलूस तालुका व जिल्ह्यामध्ये पक्षाच्या विकासासाठी जास्तीतजास्त योगदान देणार आहे.

प्रशांत लेंगरे यांचे तालुका प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

अत्यंत लढवय्ये शिवसैनिक म्हणून ते तालुक्याला परिचित आहेत आणि तरुण शिवसैनिक मोठ्या प्रमाणात त्यांच्यासोबत आहेत.


जाहिरात

 

शिवसेना पलूस तालुका प्रमुखपदी प्रशांत लेंगरे

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
इंग्लीश स्पिकिंग शिकताना नेमकं काय चुकतं?

निमंत्रित लेख प्रत्येकालाच इंग्लीश बोलायला शिकायचे आहे, आणि ते अगदी स्वाभाविक आहे. यामध्ये मराठीला कमी लेखणे किंवा मातृभाषेशी प्रतारणा करण्याचा

Close